शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

आरोग्याच्या गोष्टी सवयींच्या खात्यात टाका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 11:31 IST

Health News: आपल्या शरीराशी संवाद करा, प्राणायाम करा, प्रार्थनेचे महत्त्व... अशा गोष्टींबद्दल लिहिताना मला आठवत असते ते कोरोना नावाच्या एका टीचभर जिवाणूने काही काळापुरते आरपार बदलून टाकलेले आपले आयुष्य.

आपल्या शरीराशी संवाद करा, प्राणायाम करा, प्रार्थनेचे महत्त्व... अशा गोष्टींबद्दल लिहिताना मला आठवत असते ते कोरोना नावाच्या एका टीचभर जिवाणूने काही काळापुरते आरपार बदलून टाकलेले आपले आयुष्य. एकाकीपणाच्या धास्तीने आणि या अज्ञात शत्रूची चाल, हल्ल्याची तीव्रता हे काहीही समजत नसल्याने आपल्याला पुरते घेरून टाकलेल्या भीतीने किती बदलून टाकले आपले आयुष्य...! 

कित्येक नव्या सवयी आपण स्वीकारल्या. रोज व्यायाम करायला लागलो, त्यासोबत प्राणायाम आवर्जून शिकून घेतला, रोजची प्रार्थना, जमेल तेवढे ध्यान आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनले. आरोग्य आणि स्वच्छता, आहार यांबद्दल सजगता आली; पण कोरोनाने पाय काढता घेतला आणि जेवढ्या वेगाने आपण शहाणे झालो तितक्याच वेगाने पुन्हा आपला दिनक्रम ‘पूर्वपदावर’ (!) यायला लागला. सहज शांतपणे विचार करून बघू, कोरोनाच्या निमित्ताने आपण लावून घेतलेल्या सवयी वाईट होत्या? फक्त कोरोनाकाळातच त्या टिकून राहणाजोग्या होत्या? नेहमीच्या आयुष्यासाठी उपकारक नव्हत्या?.. 

या प्रश्नांची उत्तरे आपल्या जीवनविषयक मूल्यांमध्ये दडलेली आहेत. आपल्या आयुष्यात नेमके कशाला महत्त्व आहे? आरोग्य / स्वास्थ्य याचे आपल्या लेखी मोल काय? या प्रश्नांची उत्तरे आपण या निमित्ताने घेतली पाहिजेत. जेव्हा परिस्थिती पाठीत रट्टा हाणते तेव्हा नव्या, चांगल्या सवयी बाणवून घेण्यासाठी आपल्याला काही तासांचा अवधी पुरतो. पण परिस्थिती पालटताच गाडी तेवढ्याच वेगाने मागे येते, तेव्हा प्रश्न पडतो, या नव्या लावून घेतलेल्या सवयी ही आपल्यासाठी निव्वळ मजबुरी होती?

काही नव्या सवयी लावण्याची मजबुरी आपल्यावर जरूर आली, पण त्यामुळे बदललेले आयुष्य आणि आरोग्याचा दर्जा, याचे काय? आरोग्य सांभाळण्यासाठी नव्या सवयी जाणीवपूर्वक अंगिकाराव्या लागतात आणि लागलेल्या टिकवून ठेवाव्या लागतात. कोरोनाकाळात लागलेल्या सवयीमुळे आपल्या आरोग्याची गाडी रुळावरून उतरली नाही, हे ज्यांना समजले ती माणसे शहाणी म्हणायला हवीत. सवयी आपल्या मेंदूचे कष्ट कमी करतात. एखादी सवय एकदा लागली की त्याबाबत विचार करण्याची मेंदूला गरज वाटेनाशी होते. आरोग्यासाठी करावयाच्या गोष्टी अशा सवय नावाच्या खात्यात टाकून द्या; म्हणजे त्या आपोआप होऊ लागतील. पुन:पुन्हा त्यांच्या मागे लागावे लागणार नाही.

टॅग्स :Healthआरोग्य