शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हंटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
4
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
5
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
6
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
7
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
8
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
9
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
10
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
11
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
12
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
13
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
14
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
15
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
16
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
17
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
18
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
19
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?

काळजी वाढली! कोरोनानंतर केरळच्या आणखी एका जिल्ह्यात 'शिगेला'चा कहर; जाणून घ्या लक्षणं

By manali.bagul | Updated: December 31, 2020 15:34 IST

Health News in Marathi : या आजाराची लक्षणं असलेले लोक आता एर्नाकुलम जिल्ह्यातही दिसून येत आहेत. येथील एका  ५६ वर्षीय महिलेमध्ये या आजाराची लक्षणं दिसून आली आहेत.

केरळमध्ये कोरोनाची माहामारी पसरल्यानंतर संक्रमणाचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यााठी  प्रभावी उपाययोजना करण्यात आल्या होत्या. आता केरळमध्ये कोरोनाप्रमाणेच शिगोला या आजाराचा प्रसार होत आहे. या आजारामुळे ११ वर्षीय मुलाला मृत्यूचा सामना करावा लागला आहे. या आजाराची लक्षणं असलेले लोक आता एर्नाकुलम जिल्ह्यातही दिसून येत आहेत. येथील एका ५६ वर्षीय महिलेमध्ये या आजाराची लक्षणं दिसून आली आहेत.

केरळमधील कोझिकोडनंतर आता एर्नाकुलममध्येही शिगोला या आजाराचे रूग्ण आढळून आले आहेत. चोट्टानिक्काराच्या रहिवासी असलेल्या एका ५६ वर्षीय महिलेत लक्षणं दिसून आली होती. या महिलेवर एर्नाकुलमच्या एका खासगी रुग्णालायात उपचार सुरू आहेत. २३ डिसेंबरला तीव्र तापाची लक्षणं दिसल्यामुळे या महिलेला रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं.

एर्नाकुलम जिल्ह्यातील जिल्हाधिकारी एस सुहास म्हणाले की,'' घाबरून जाण्याचे कारण नाही. केवळ दोन जणांना निरीक्षणाखाली ठेवले आहे. आरोग्य विभागातर्फे दिलेल्या माहितीनुसार की या भागात लसीकरण मोहीम सुरू आहे. चोट्टनिक्कारा आणि आजूबाजूचा परिसर निर्जंतुकीकरण केला जात आहे.''

दरम्यान कोझिकोड जिल्ह्यात एका दीड वर्षीय मुलाला पोटदुखी आणि अतिसाराचा त्रास होऊ लागल्यानं त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याला शिगेला जीवाणूंचा संसर्ग झाल्याची माहिती काल डॉक्टरांनी दिली. शिगेला जीवाणूंमुळे शिगेलॉसिस हा आतड्यांचा आजार होऊ शकतो. केरळमध्ये आतापर्यंत शिगेलाचे ८ रुग्ण सापडले आहेत.

Coronavirus: भारतात कोरोनाचा आणखी एक गंभीर साइड इफेक्ट आला समोर, डॉक्टरांनी दिला इशारा....

शिगेलाचे रुग्ण आढळून येऊ लागल्यां कोझिकोड जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था अलर्टवर आहे. कोझिकोड जिल्हा याआधी निपाह विषाणूचे रुग्ण सापडल्यानं चर्चेत आला होता. 'जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात असून घाबरण्याची आवश्यकता नाही. प्रशासन आवश्यक पावलं उचलत आहे,' अशी माहिती कोझिकोडच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. व्ही. जयश्री यांनी दिली होती.

आधीपेक्षा जास्त जीवघेणा ठरणार कोरोनाचा नवा स्ट्रेन? संशोधनातून समोर आली महत्वाची माहिती

लोकांनी सतर्क राहावं आणि अतिसाराचा त्रास होताच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असं आवाहन डॉ. जयश्री यांनी केले होते. अतिसार हे शिगेला संसर्गाचं प्रमुख लक्षण आहे. गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात २६ जणांना अतिसाराचा त्रास झाला आहे. संक्रमित जेवण आणि पाण्यामुळे शिगेला जीवाणूचा संसर्ग होत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. केरळमधील मुंडिक्कल्थजम, कोट्टापरंबू आणि वायनाडमध्ये शिगेलाचे रुग्ण आढळून आले आहेत. शिगेलामुळे काही दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला. कोझिकोडमध्ये १९ डिसेंबरला एक ११ वर्षीय मुलगा शिगेलाचा बळी ठरला.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्याKeralaकेरळ