HEALTH : श्रेयस तळपदेच्या पत्नीला घेरलेल्या 'या' जीवघेण्या आजाराची लक्षणे जाणून घ्या !
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2017 16:15 IST
आतापर्यंत शेकडो लोकांचा बळी घेणाऱ्या स्वाईन फ्लूने यंदाही आपला प्रकोप दाखवायला सुरूवात केली आहे.
HEALTH : श्रेयस तळपदेच्या पत्नीला घेरलेल्या 'या' जीवघेण्या आजाराची लक्षणे जाणून घ्या !
दरवर्षी पावसाळ्यात अनेकांचा बळी घेणाऱ्या स्वाईन फ्लूने आताही डोके वर काढले असून संपूर्ण देशात थैमान घातले आहे. या जीवघेण्या आजाराने मराठी व हिंदी अभिनेता श्रेयस तळपदे याची पत्नी दिप्ती हिलादेखील घेरले आहे. दिप्तीला स्वाईन फ्लू झाल्याने इस्पितळात भरती करण्यात आले आहे. आतापर्यंत शेकडो लोकांचा बळी घेणाऱ्या स्वाईन फ्लूने यंदाही आपला प्रकोप दाखवायला सुरूवात केली आहे. एन्फ्लुएंझा-ए वायरस ‘एच१ एन१’ असे नाव असलेल्या या रोगाने परदेशात डुकरांच्या मार्फत माणसांच्या शरीरात प्रवेश केला. त्यानंतर विदेशाहून येणाºयांच्या सोबतीने या रोगाने भारतात प्रवेश केला. आतापर्यंत २० अंश सेल्शिअसच्या वर तापमान गेले की हे विषाणू मरून जायचे. परंतु यावर्षी उन्हाळ्यात विदभार्तील पारा ४२ अंश सेल्शिअसच्या वर जाऊनही अनेक स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळले. या विषाणूने स्वत:मध्ये बदल करून स्वत:ला वातावरणासोबत अनुकूल केले असल्याचे वैद्यकीय संशोधकांचे मत आहे. आता पावसाळा सुरू झाल्यावर विविध शहरांमध्ये स्वाईन फ्लूच्या रुग्णांची नोंद वाढत आहे. या रोगाला आटोक्यात आणण्यासाठी काही गोष्टींची खबरदारी घेणे आवश्यक आहे. * स्वाईन फ्लूची लक्षणे - ताप येणे- खूप थकवा जाणवणे- नाक वाहणे - गळा कोरडा होणे- धाप लागणे व खोकला- भूक न लागणे- स्नायूंमध्ये दुखणे - डायरिया - उलटी *स्वाईन फ्लूपासून बचावासाठी घ्यावयाची काळजी* गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा.* हात स्वच्छ ठेवा. गरम पाण्याने वारंवार हात धुवा. * शिंकताना किंवा खोकताना तोंडावर रुमाल ठेवा.* भरपूर झोप घ्या. दररोज आठ तास झोप घ्या. जास्त झोप घेतल्याने तुमची रोगप्रतिकारक क्षमता वाढते. यामुळे तुम्हाला या विषाणूंचा संसर्ग होण्याची शक्यता कमी होते. source : marathi.eenaduindia