शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

HEALTH : शरीरात वेदना होताहेत, तर वेदनाशामकाऐवजी वापरा घरगुती पर्याय !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2017 16:50 IST

वेदनाशामकामुळे लगेचच आराम मिळतो हे जरी खरे आहे, मात्र याचा शरीरावर साईडइफेक्टही होतो. अशावेळी आपण दुखण्यापासून आराम मिळविण्यासाठी प्राकृतिक पर्यायदेखील वापरु शकता.

-Ravindra Moreशरीरात जेव्हाही काही वेदना झाल्या तेव्हा आपण वेदनाशामक औषधे घेण्याची लगेच घाई करतो. होणाऱ्या वेदनांपासून लगेच आराम मिळण्यासाठी आपण हा पर्याय अवलंबितो. वेदनाशामकामुळे लगेचच आराम मिळतो हे जरी खरे आहे, मात्र याचा शरीरावर साईडइफेक्टही होतो. अशावेळी आपण दुखण्यापासून आराम मिळविण्यासाठी प्राकृतिक पर्यायदेखील वापरु शकता. प्राकृतिक पर्याय शरीरावर लवकर आणि चांगला परिणाम करतात. प्राकृतिक पयार्यांमध्ये खानपानाचे काही विशेष नियम देण्यात आले आहेत. आपल्या खानपानात बदल केल्यास आपण दुखण्यापासून मुक्त होऊ शकता. सध्या डब्बाबंद खाद्यपदार्थांचा उपयोग जास्त होत आहे, त्यामुळे आपण पोषणापासून चारहात लांब जात आहोत. यासाठी असे खाणे अगोदर बंद करा. सोबतच खाली दिलेले उपाय अवलंबिल्यास होणाऱ्या वेदनांपासून दूर राहू शकता. * मांसपेशीत वेदना-  सांधे आणि मांसपेशींच्या दुखण्यावर अद्रकाचा खूप चांगला उपचार आहे. यात जिंजरोल नावाचे रसायन असते जे दुखणे दूर करणाºया हार्मोन्सना स्त्रावित करते आणि आपल्या मांसपेशींना मदत करते. त्यामुळे त्यांचा ताण कमी होऊन दुखणे कमी होते. * दातदुखी- दाताचे दुखणे आणि हिरड्यांसंबधी आजारांवर लवंगाचा प्रयोग प्राचीन काळापासून करण्यात येत आहे. लवंग दातदुखीवर खूपच उपयुक्त आहे. यातील यूजेनोल नावाच्या पदार्थामुळे दुखणे थांबते.  * छातीत जळजळ होणे- छातीत जळजळ होत असेल तर सफरचंद खा. यात मॅलिक आणि टारट्रिक आम्ल असते, जे जेवणातील वसा आणि प्रोटीन्सला सहजतेने पचण्यास मदत करते. यामुळे पोट लवकर रिकामे होते आणि अतिरिक्त जेवणामुळे होणाºया जळजळीपासून आराम मिळतो. * कानदुखी- लसणाला तेलात जाळून कानात टाकल्यास कानाचे दुखणे थांबते. अगोदर लोक याचप्रकारचे प्राकृतिक उपचार करीत असत. लसूणमधील सल्फर आणि सेलेनियम दुखणे निर्माण करणाऱ्या जिवाणूंना नष्ट करतात. * डोकेदुखी- एक वाटी चेरी रोज खाल्ल्याने डोकेदुखी थांबते. चेरीतील ‘एंथोसायनिन’ डोक्यातील नसांची सूज कमी करते, त्यामुळे डोकेदुखीपासून आराम मिळतो. * पोटदुखी- विविध प्रकारचे मासे खाल्ल्याने पोटातील आतड्यांची सूज कमी होते शिवाय पोटाच्या इतर तक्रारीही दूर होतात. यात उच्च प्रोटीन असते, जे पाचनतंत्रात खूप महत्त्वाची भूमिका निभाविते. अशावेळी आपण दहीदेखील खाऊ शकता.  * सांधेदुखी- आॅर्थराईटिस सारख्या दुखण्यावर हळदीचा प्रयोग खूपच चांगला असतो. हळदीत कुर्कमिन असते, जे दुखण्यावर आराम देते. दूधात हळद मिक्स करुन घेतल्यास याचाही चांगला फायदा होतो. * पायांत वेदना होणे- पायांत दुखण्याने बरेचजण त्रस्त असतात. अशावेळी कोमट पाण्यात मीठ टाकून त्यात पाय बुडविल्याने आराम मिळतो. मिठात जीवाणूरोधक गुण असतात, सोबतच सूजेवरदेखील खूप लाभदायक आहे.