शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

Health : योग्य व्यावसायोपचाराने टाळता येऊ शकतो हृदयरोग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 04:03 IST

सध्या हृदयरोगाच्या प्रमाणात कमालीची वाढ झाली आहे. हदयरोग म्हणजेच कोरोनरी आर्टरी डिसिजबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया.

 - डॉ. जयश्री काळे (प्राचार्य व विभागप्रमुख, केईएम)सध्या हृदयरोगाच्या प्रमाणात कमालीची वाढ झाली आहे. हदयरोग म्हणजेच कोरोनरी आर्टरी डिसिजबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊ या. हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये जेव्हा स्निग्धपणा साठतो आणि कालांतराने त्यांच्या मूळ रचनेत बदल होतो, तेव्हा हृदयाला रक्तपुरवठा कमी प्रमाणात होतो. हृदयाला रक्त पुरवणाऱ्या या रक्तवाहिन्या जेव्हा पूर्णपणे बंद होतात, तेव्हा हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.हृदयरोग अनेकदा वयस्कर व्यक्तींमध्ये अधिक आढळतो; परंतु सध्याच्या काळात ‘हार्ट अटॅक’चे प्रमाण तरुण वयोगटातही आढळून येत आहे. त्याला आजची जीवनशैली, रोजची धावपळ, नोकरीमुळे येणारा ताण, स्पर्धेचे युग इ. कारणे आहेत. शाळकरी मुलांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण अधिक वाढले आहे. लहानपणापासून असलेली फास्ट फुडची आवड हे त्याचे प्रमुख कारण. त्यात स्रिग्ध पदार्थ व शरीराला घातक अशा तेलाचा समावेश असतो. लहान वयापासूनच मुलांच्या उंची व वजनाचे प्रमाण बिघडलेले असते.व्हिडीओ गेम, सेल फोन व टीव्हीसमोर मुले तासन्तास घालवतात. आपण दमलो आहोत, या कल्पनेने त्यांच्या भुकेचे प्रमाण त्यांना कळत नाही. नकळत अथवा विरंगुळा म्हणून नको तितके खाल्ले जाते. त्यांची हालचाल आजच्या तंत्रज्ञानाच्या जगात एकंदरच कमी झालेली आहे.नोकरीला जाणारे आईवडील कमी वेळ देत असल्यामुळे घरी परतल्यानंतर आईबाबांचे प्रेम अधिकच उतू जाते. अनाठायी हट्ट पुरविले जातात. प्रेमळ आई, आजी किडकिडीत वाटणाºया मुलांचे वजन वाढविण्याच्या अतोनात प्रयत्नात असतात. नको ते व नको तितक्या खाद्यपदार्थांची बळजबरी होते. अयोग्य व अति खाण्यामुळे शरीरावर न दिसणारी चरबी रक्तवाहिन्यांमध्ये साठते व अल्पवयातच हृदयविकाराशी निगडित एक बेसलाइन तयार होते. मुले १७-१८ वर्षांची झाली की त्यांना त्यांच्या लठ्ठपणाची जाणीव होण्यास सुरुवात होते. मग काय? जिमचे फॅड डोक्यात शिरते, तासन्तास नको त्या व प्रमाणाबाहेरच्या कसरतींची सुरुवात होते आणि त्या सुस्त शरीरावर प्रयोग सुरू होतात. कधी हेवी वेट लिफ्ट्स, कधी ट्रेडमिलवर धावणे, कधी पहाटेची साखरझोप कुर्बान करून मैलोन्मैल धावणे तर कधी सतत खाणाºया पोटाला कडक डाएटिंगची शिक्षा दिली जाते.एका महिन्यात दहा किलो वजन कमी करण्याच्या लक्ष्याचा कोणीही विचार करत नाही. नेहमीच आळशीपणाने जगणारे हृदय व शरीराचे वजन झेलणारे हृदय अचानकपणे इतक्या तीव्र गतीला साथ देईल का? एरवीसुद्धा लठ्ठ व्यक्तीमध्ये हृदय आधिक प्रमाणात काम करत असतेच, वर अचानकपणे सुरू केलेल्या व्यायामाचा मारा! या सर्व गोष्टींमुळे हृदयावर दुष्परिणाम होतात. कालांतराने व्यायामाच्या अधिक ताणामुळे हृदयाच्या आकुंचन -प्रसारण प्रक्रियेवर तसेच रक्तपुरवठ्यावरीही परिणाम होतो. त्याचमुळे वजन कमी करण्याची प्रक्रिया व व्यायाम सुरू करताना तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच केली पाहिजे. वेळोवेळी तज्ज्ञ डॉक्टरांकडून रक्तदाब, मधुमेह इत्यादीसाठी तपासणी करून घेणे आवश्यक आहे.जीवनशैलीत योग्य बदल, योग्य आहार, योग्य व्यायाम, पुरेशी झोप याची काळजी घेतली तर हृदयरोगाशी निगडित बºयाचशा धोकादायक बाबी आपल्या आटोक्यात राहू शकतात. पालकांनी लहानपणीच मुलांना आहाराच्या चांगल्या सवयी लावणे गरजेचे आहे. स्रिग्ध पदार्थ व अतिरिक्त उष्मांक टाळून, आहारात फायबरयुक्त घटकांचा समावेश करणे महत्त्वाचे आहे. तसेच खाण्यात आलेल्या उष्माकांचा वापरही झाला पाहिले. मुलांना मैदानी खेळ स्विमिंग, सायकलिंग तसेच आवडणाºया खेळांवर जोर देण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे. शिवाय २४ तासांच्या दिनचर्येत संतुलन ठेवणे तितकेच चांगले असते. हल्लीच्या स्पर्धेत आपल्या पाल्याने भरघोस यश मिळवलेच पाहिजे या दृष्टीने पालक अभ्यासाच्या तणावाखाली मुलांचे बालपण हरवून टाकतात. मुलांचा अधिक वेळ ट्युशन, अन्य शिकवणी वर्ग यात व्यापला जातो. अभ्यासाच्या दडपणाखाली त्यांना काही करण्यासाठी वेळ व शक्ती उरत नाही. त्याचा परिणाम त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर होतो. हुशार असूनही हुशारीचा फायदा ते करू शकत नाही.केईएम रुग्णालयात व्यावसायोपचार शास्त्र विभागात वरील सर्व गोष्टींवर म्हणजे योग्य व्यायाम, जीवनशैलीत बदव, वजन, रक्तदाब, मधुमेह आटोक्यात ठेवण्यासाठी उपाय सांगितले जातात. येथे बालपण तसेच प्रौढावस्थेतील स्थूलतेवरही सल्ला दिला जातो.

टॅग्स :Heart DiseaseहृदयरोगHealth Tipsहेल्थ टिप्स