HEALTH : सकाळी लिंबू पाणी पिणे हानिकारक !
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2017 17:31 IST
लठ्ठ माणसांना सकाळी उठल्यानंतर लिंबू पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. मात्र हे आरोग्यासाठी हानिकारण असल्याचे एका संशोधनात स्पष्ट झाले आहे.
HEALTH : सकाळी लिंबू पाणी पिणे हानिकारक !
लठ्ठ माणसांना सकाळी उठल्यानंतर लिंबू पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. मात्र हे आरोग्यासाठी हानिकारण असल्याचे एका संशोधनात स्पष्ट झाले आहे. अनाशापोटी निंबू पाणी पिण्याचे काय दुष्परिणाम होतात हे आज जाणून घेऊया.* जर आपणास गॅस किंवा अॅसिडिटीची समस्या असेल तर आपण रिकाम्या पोटी लिंबू पाणी घेणे टाळाच. कारण लिंबूमध्ये अॅसिडिक तत्त्व असतात, ज्यामुळे ही समस्या अजूनच वाढते. * लिंबू मध्ये आॅक्सलेट अॅसिड असते जे शरीरात क्रिस्टल स्वरुपात जमा होते. यामुळे किडनी आणि पित्ताच्या पिशवीत स्टोनची समस्या निर्माण होते. * लिंबू पाणी पिल्याने लगेचच ब्रश करु नये कारण लिंबूतील अॅसिडमुळे दात कमकुवत होतात. त्यामुळे ब्रश करताना दात तुटण्याची शक्यता असते. * दिवसभरात फक्त एक किंवा दोन ग्लास लिंबू पाणी प्या. जास्त लिंबू पाणी पिल्याने लघवी जास्त होते. ज्यामुळे डिहायड्रेशनची समस्या निर्माण होते. * बहुतांश लोक केलेले जेवण पचविण्यासाठी लिंबू पाणी पितात. मात्र हे नुकसानकारकही ठरु शकते. पोटात अॅसिडचे प्रमाण जास्त असल्याने पचनसंस्था बिघडू शकते. * जर आपले दात सेंसिटिव असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच याचे सेवन करावे. किंवा लिंबू पाण्याचा दातांशी संपर्क येऊ नये म्हणून स्ट्रॉने प्यावे. Also Read : लिंबूू खा, वजन घटवा !