HEALTH : शरीरावरील ‘खाज’कडे करु नका दुर्लक्ष, असू शकतात गंभीर आजार !
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2017 11:54 IST
बऱ्याचदा आपल्या शरीरावर खाज सुटते, आणि आपण स्किन इरिटेशन समजून त्याकडे दुर्लक्ष करतो. मात्र ही खाज अनेक गंभीर आजारांचे लक्षणही असू शकते.
HEALTH : शरीरावरील ‘खाज’कडे करु नका दुर्लक्ष, असू शकतात गंभीर आजार !
बऱ्याचदा आपल्या शरीरावर खाज सुटते, आणि आपण स्किन इरिटेशन समजून त्याकडे दुर्लक्ष करतो. मात्र ही खाज अनेक गंभीर आजारांचे लक्षणही असू शकते.आपणासही खाज येत असेल तर त्वरित सतर्क व्हायला हवे. यासाठी आम्ही आपणास काही लक्षणांची माहिती देत आहोत. * शरीरात जर कॅन्सरसदृश्य गाठी असतील तर त्यातून निघणाऱ्या पदार्थांच्या रिअॅक्शनमुळे शरीरात खाज सुटण्याची शक्यता वाढते. * लिव्हर खराब झाल्यास संपूर्ण शरीरातील डिटॉक्झिफिकेशन प्रक्रियेवर प्रभाव पडतो. यामुळे शरीरात खाज निर्माण होते.* किडनीमध्ये अडथळा निर्माण झाल्यास शरीरातील विषद्रव्य म्हणजे टॉक्झिन्स बाहेर निघू शकत नाहीत. यामुळे शरीरात खाज सुटते.* रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यास रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो त्यामुळे शरीरावर खाज सुटते. * औषधे किंवा खाण्या-पिण्याचे पदार्थ यांमुळे होणाऱ्या अॅलर्जीमुळेदेखील खाज सुटू शकते. * घाम किंवा फंगल इन्फेक्शनमुळे शरीरात खाज निर्माण होते. * हॉर्मोनल बदलांमुळे त्वचा कोरडी होते. यामुळे शरीर खाजवते. * शरीरात पाण्याची कमतरता असल्यास डिहायड्रेशन होते. अशा स्थितीत शरीरात खाज निर्माण होते.