शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, कोणाला किती पैसे मिळणार?
2
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
3
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
4
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
5
प्रसिद्ध लेखिका अर्चना शंभरकर यांचे निधन, वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
6
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
7
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
8
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
9
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
10
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
11
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
12
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

HEALTH : ​झटपट वजन कमी करण्याच्या प्रयत्नात होऊ शकतात ‘हे’ गंभीर परिणाम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2017 12:52 IST

आपणही कोणाचा तरी आदर्श डोळ्यासमोर ठेवून झटपट वजन कमी करण्याचा प्रयत्न करतो. मात्र या पद्धतीने झटपट वजन कमी करण्याचा प्रयत्न आरोग्यासाठी घातक ठरु शकतो.

आपण नेहमी ऐकत असतो की, या सेलिब्रिटीने एवढ्या दिवसात वाढलेले वजन कमी केले. त्यात करिना कपूरने प्रेग्नन्सीनंतर वाढलेले वजन कमी करणे, आमिर खानने ‘दंगल’साठी वाढवलेले वजन कमी करणे, भूमि पेडणेकरने चित्रपटासाठी वजन कमी करणे आदी बरीच उदाहरणे देता येतील. आपणही कोणाचा तरी आदर्श डोळ्यासमोर ठेवून झटपट वजन कमी करण्याचा प्रयत्न करतो. यासाठी बहुतांशजण क्रॅश डाएटचा पर्यायही निवडतात. मात्र या पद्धतीने झटपट वजन कमी करण्याचा प्रयत्न आरोग्यासाठी घातक ठरु शकतो.  * क्रॅश डाएटवर असताना अनेकदा घटणारे वजन हे शरीरातील वॉटर वेट कमी करते. क्रॅश डाएटमुळे फॅट कमी होतीलच असे नाही. सोबतच शरीराला आवश्यक असणारे पाणीदेखील न मिळाल्याने अनेक समस्या वाढू शकतात. डोकेदुखी, थकवा, बद्धकोष्ठता यामुळेही डीहायड्रेशनचा त्रास वाढतो. वेळीच डीहायड्रेशनच्या समस्येकडे लक्ष न दिल्यास किडनीच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होऊ शकतात.  * क्रॅश डाएटवर असणाऱ्या लोकांच्या शरीरात सोडीयमची पातळी कमी होते. त्यामुळे थकवा जाणवून गरगरल्यासारखे होते. शिवाय यामुळे शरीरात इलेक्ट्रोलेट बॅलन्सची पातळी कमी जास्त होऊ शकते. याचा परिणाम कार्डियोव्हसक्युलर फंशनवर होतो.*  क्रॅश डाएटमुळे जसे हृद्याचे आरोग्य धोक्यात येते तसेच व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सचीदेखील कमतरता निर्माण होते. शरीरात मुबलक आयर्न नसल्यास अ‍ॅनिमियाचा त्रास बळावू शकतो तर व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे आॅस्टोपोरायसिसचा त्रास वाढतो.* शरीराला आवश्यक असणाऱ्या कॅलरीजपेक्षा कमी डाएट घेतल्यास उपासमार होते. यामुळे शरीरात एनर्जी साचवून ठेवली जाते. त्याचा परिणाम मेटॅबॉलिझमवरही होतो. शरीराला पुरेसे प्रोटीन,न मिळाल्यास स्नायू कमजोर होतात. यामुळेदेखील शरीराचा मेटॅबॉलिझम रेटही कमी होतो.   * लहान सहान गोष्टी असतील तर शरीर त्यानुसार स्वत:मध्ये बदल करते. मात्र अचानक आणि मोठे बदल झाल्यास आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतात. अचानक अन्न घेण्याकहे प्रमाण कमी झाल्यास, शरीराचे चक्र बिघडते. Also Read : ​​Health : जापानी सेलिब्रिटी वजन कमी करण्यासाठी वापरतात ‘हा’ खास फार्मुला !                   : ​Health : ...तर अशा प्रकारे करिना कपूरने प्रेग्नन्सीनंतर वजन केले कमी !