शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

HEALTH : ब्रेस्ट इम्प्लांट : कॅन्सरचे माहेरघर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2017 15:44 IST

आपलेही स्तन आकर्षक दिसावेत, असे आजच्या असंख्य तरुणींना वाटते, मात्र यामुळे कॅन्सर होऊ शकतो... जाणून घ्या सविस्तर !

-रवींद्र मोरे आपले सौंदर्य वाढविण्यासाठी बॉलिवूडच्या अभिनेत्री आणि मॉडेल्स यांनी स्तनवृद्धीच्या शस्त्रक्रिया म्हणजेच ब्रेस्ट इम्प्लांट केले असून त्यांचाच आदर्श आजच्या तरुणींनीही डोळ्यासमोर ठेवला आहे. आपलेही स्तन आकर्षक दिसावेत, असे आजच्या असंख्य तरुणींना वाटते शिवाय यासाठी बऱ्याच तरुणी अतिआग्रही असतात. यामुळेच आज जगात मोठ्या प्रमाणावर ब्रेस्ट इम्प्लांट शस्त्रक्रिया होत आहेत. ब्रेस्ट इम्प्लांटची शस्त्रक्रिया ही कर्करोगामुळे स्तन काढून टाकल्यावर येणारा विद्रुपपणा दूर करण्यासाठी शोधली गेली. मात्र आज त्याचा वापर सौंदर्यवर्धनासाठी जास्त प्रमाणात होत आहे. जाणकारांच्या मते, एकट्या अमेरिकेत दरवर्षी ४ लाख स्त्रिया स्तनवृद्धी शस्त्रक्रिया करून घेतात. भारतीय स्त्रियांमध्येही ही क्रेझ दिवसेंदिवस वाढत असून आतापर्यंत ४०० पेक्षा अधिक केंद्र कार्यरत झाली आहेत. विशेष म्हणजे दरवर्षी सुमारे ७० हजार स्त्रिया दीड ते अडीच लाख रुपये खर्च करुन ही शस्त्रक्रिया करून घेतात. या शस्त्रक्रियेत सिलिकॉनयुक्त रबरानं बनलेली, भरपूर ताणली जाईल अशी एक इलॅस्टिक पिशवी (सिलिकॉन इलॅस्टोमर) वापरली जाते. पहिल्या प्रकारात त्यामध्ये सलाइन म्हणजे क्षारयुक्त द्राव भरून ती हवी तेवढी फुगवली जाते. दुसऱ्या प्रकारात त्या पिशवीत सिलिकॉन भरून ती फुगवली जाते. दोन्ही प्रकारात शस्त्रक्रिया करून ती पिशवी स्तनाच्या आत बसवली जाते.  ब्रेस्ट इम्प्लांट या शस्त्रक्रियेमुळे जरी सौंदर्यात भर पडत असेल, मात्र अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनानं (एफडीए) एप्रिल २०१७ मध्ये एक विशेष अहवालात ब्रेस्ट इम्प्लांटबद्दल काही धोक्याच्या सूचना दिल्या आहेत.  * इम्प्लांट केलेल्या पिशवीच्या शेजारील भागात कडक गाठी तयार होतात. त्यात शरीरातील कॅल्शियम जमा होऊन त्या दगडासारख्या टणक बनतात. स्तनांच्या मॅमोग्राफीमध्ये त्या कर्करोगाच्या गाठी असल्याचं निदान होऊ शकतं.* इम्प्लांटच्या आजूबाजूचा स्तनातील नैसर्गिक मांसल भाग, त्वचा आकसून जाते. त्यामुळे स्तन अकारण कडक आणि घट्ट होतात.* दोन्ही स्तनांचे आकार वेगवेगळे आणि असमान दिसू शकतात.* शस्त्रक्रियेच्या जागेवर सातत्यानं खूप वेदना होत राहतात.* छातीच्या बरगड्या वेड्यावाकड्या होतात. *सलाइन इम्प्लांटमधील पिशवीला छिद्र किंवा भेग पडून त्यामधून लिकेज होतं आणि त्यातील क्षारयुक्त द्राव बाहेर पाझरू लागतो. काही रुग्णात हे इम्प्लांट फुगा फुटावा तसे आतल्या आत फुटून जातात. त्यामुळे इम्प्लांट पूर्ण आकसून जातो.*काही स्त्रियांमध्ये इम्प्लांट बसवलेला आहे, हे स्पष्ट कळू शकते.*बाळंतपणानंतर बाळाला दूध पाजताना त्रास होतो.*शस्त्रक्रियेच्या जागेत रक्ताच्या गाठी होणं, त्यात जंतूसंसर्ग होऊन पू होणं असे अनेक त्रास होऊ शकतात.  * २०११ मध्ये करण्यात आलेल्या संशोधनानुसार, ब्रेस्ट इम्प्लांटमुळे स्त्रियांना ‘अ‍ॅनाप्लास्टिक लार्ज सेल लिम्फोमा’ हा एक प्रकारचा कर्करोग होऊ शकतो, असं अमेरिकन एफडीएने जाहीर केले होते. याव्यतिरिक्त स्तनाचाच नव्हे, तर फुफ्फुसांचा किंवा पोटाचा कर्करोग होण्याचीदेखील शक्यता असते. याशिवाय सौंदर्य वाढविण्यासाठीचा हा प्रयत्न तात्परता ठरला आहे. जागतिक आकडेवारीनुसार, सिलिकॉन इम्प्लांट बसवलेल्या ४६ टक्के स्त्रियांमध्ये आणि सलाइन इम्प्लांटच्या २१ टक्के स्त्रियांना कमीत कमी तीन वर्षांनी पुन्हा शस्त्रक्रिया करून आपलं सौंदर्य व्यवस्थित करावे लागते.हा धोका पत्करण्यापेक्षा, आहे त्या नैसर्गिक सौंदर्यातच राहावे किंवा अशी शस्त्रक्रिया करण्याअगोदर तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा. source : maharashtra timesAlso Read : ​OMG : ​स्तन कर्करोगाने भारतात सर्वाधिक मृत्यू, जगात अव्वल !                   : ​HEALTH : ब्रेस्ट कॅन्सरशिवाय ‘या’ ५ गंभीर समस्या आहेत ‘ब्रेस्ट’साठी त्रासदायक !