शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
3
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
4
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
5
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
6
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
7
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
8
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
9
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
10
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
11
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
12
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
13
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
14
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
15
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
16
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
17
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
18
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
19
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
20
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे

Health Tips : हृदयरोग आणि हाडांची समस्या दूर ठेवण्याचा सोपा उपाय, 'या' डाळीचा आहारात करा समावेश!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2022 11:06 IST

Health benefits of Urad Dal : उडदाच्या डाळीचे जर तुम्ही फायदे वाचले तर तुम्ही नियमितपणे या डाळीचा आहारात समावेश कराल. इतकंच काय तुम्ही आवडीने ही डाळ खाल आणि इतरांनाही खायला सांगाल. 

Health benefits of Urad Dal :  उडदाची डाळ खायची म्हटलं तर अनेकजण नाक मुरडतात. अनेकांना ही डाळ चिकट होते म्हणून आवडत नाही. पण उडदाच्या डाळीचे जर तुम्ही फायदे वाचले तर तुम्ही नियमितपणे या डाळीचा आहारात समावेश कराल. इतकंच काय तुम्ही आवडीने ही डाळ खाल आणि इतरांनाही खायला सांगाल. 

उडीद डाळीचे फायदे

उडीद डाळीत न्यूट्रीशनल व्हॅल्यू फार जास्त आहे. यात भरपूर प्रमाणात डायटरी फायबर असतं. तेच आयर्न, प्रोटीन पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि व्हिटॅमिन बी सुद्धा भरपूर प्रमाणात असतात.

१) हाडांसाठी फायदेशीर - उडीद डाळ हाडांसाठी फार फायदेशीर असते. उडीद डाळीत पोटॅशिअम, कॅल्शिअम, फॉस्फोरससारखे तत्व भरपूर प्रमाणात असतात. याने हाडे मजबूत होतात. ही डाळ खाल्ल्याने  ऑस्टियोपोरोसिससारख्या आजाराचा धोका कमी होतो.

२) हृदयासाठीही फायदेशीर - उडीद डाळीत पोटॅशिअम भरपूर प्रमाणात असतं. ज्याने ब्लड वेसेल्स आणि आर्टरीजमध्ये तणाव कमी होतो. अर्थातच याने हृदय निरोगी आणि फीट राहतं.

३) वेदना आणि सूज होते दूर -  उडीद डाळीमध्ये भरपूर प्रमाणात अॅंटी-ऑक्सीडेंट असतात जे वेदना आणि सूज कमी करण्यासाठी फायदेशीर असतात. याने मांसपेशी आणि जॉइंटमधील वेदना कमी होते.

४) ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल होते - डायटरी फायबचं जास्त प्रमाण असल्याने उडीद डाळ ब्लड शुगर लेव्हल कंट्रोलमध्ये ठेवण्यास मदत करते. डायबिटीसच्या रूग्णांसाठी उडीद डाळ फायदेशीर असते.

५) डायजेशनमध्ये प्रभावी - जर तुम्हाला डायजेशनसंबंधी समस्या असेल तर उडीद डाळ तुम्हाला फायदा देईल. यात फायबर असतात. जे पोषक तत्व अवशोषित करण्यास मदत करतात. याच फायबरमुळे पोटाची समस्याही दूर होते.

(टिप - वरील लेखातील सल्ले किंवा माहिती ही सामान्य माहितीवर आधारित आहे. यात आम्ही कोणताही दावा करत नाही. आहारात तुम्हाला बदल करायचा असेल किंवा काही समस्या असेल तर वेळीच तज्ज्ञांनी संपर्क साधा.) 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHeart DiseaseहृदयरोगHealthआरोग्य