HEALTH : १० रुपयात विकले जात आहेत चालते-फिरते आजार !
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2017 14:49 IST
ऊसाचा रस पित आहात, सावधान ! त्या अगोदर ही बातमी वाचा, नाहीतर पडाल आजारी...!
HEALTH : १० रुपयात विकले जात आहेत चालते-फिरते आजार !
-Ravindra Moreआपणास वाटत असेल की, उन्हाळ्यात ऊसाच्या रसाचे सेवन केल्याने आपल्या गळ्याला आराम मिळेल आणि शरीरालाही फायदा होईल, मात्र असे समजणे काहीअंशी चुकीचे ठरु शकते. ऊसाचा रस पिताना थोडीसी काळजी घेतली तर आपण आजारी होण्यापासून वाचू शकता. ऊसाचा रस पिण्याअगोदर एकदा अवश्य बघा की, तो बनतो कसा. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऊसाची व्यवस्थित सफाई केली जात नाही. त्याच्यावरील मातीदेखील व्यवस्थित काढली जात नाही, असेही आढळते. शिवाय त्याच्यात मिक्स करण्यात येणाऱ्या लिंबूवर डागदेखील असू शकतात. लिंबूच्या बियादेखील काढल्या जात नाहीत. पुदीना धुतला जात नाही. रस निघाल्यानंतर ज्या भांड्यात रस येतो त्या रसाला हातानेच मिक्स केले जाते. आपण कधी विचार केला आहे का, की ज्या हाताने रस मिक्स केला जातो ते हात खरच स्वच्छ आहेत का. ज्या हातांनी ऊस पकडला जातो, जनरेटर चालविले जाते, मशिनला फिरविले जाते, ते हाथ त्यानंतर स्वच्छ पाण्याने कधीही धुतले जात नाहीत. याच कारणाने आपण आजारी पडू शकता. ऊसाला जे डाग पडलेले असतात त्यामुळे हेपॅटायटिस ए, डायरिया आणि पोटाच्या समस्या निर्माण होतात. याचप्रकारे ऊसाला लागलेल्या मातीमुळेही पोटाच्या तक्रारी निर्माण होतात. शिवाय ज्या ऊसावर लाल डाग पडलेले असतील तर त्याचा रस पिऊ नये असे काही डॉक्टरांचे म्हणणे आहे. हे डाग ऊसावर असणाऱ्या अशा ऊसाचा रस कमी गोड लागतो. शिवाय असा ऊस स्वस्तही मिळतो. अशा ऊसाचा रस आरोग्यास हानिकारक ठरु शकतो. बॉम्बे हॉस्पिटल के जनरल फिजिशियन डॉ. मनीष जैन यांच्या मते, जर साफसफाई केल्याशिवाय ऊसाच्या रसाचे सेवन केल्यास ज्वाइंडिस, हेपेटाइटिस, टायफायड, डायरियासारखे आजार होऊ शकतात.