शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
3
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
4
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
5
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
6
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
7
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
8
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
9
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
10
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
11
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
12
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
13
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
14
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
15
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
16
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
17
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
18
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
19
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?

वजन वेगाने कमी करण्यासाठी जिऱ्याचा असा करा वापर, जाणून घ्या पद्धत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2023 16:09 IST

Weight Loss : जिऱ्याचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे जिऱ्याच्या मदतीने तुम्ही वजनही कमी करू शकता. चला जाणून घेऊ ते कसं?

Weight Loss : जिऱ्याने वेगवेगळ्या पदार्थांची चव वाढते. सोबतच जिऱ्याचे आरोग्याला अनेक फायदेही होतात. बरेच लोक जिऱ्याचा औषधी म्हणूनही वापर करतात. जिऱ्याचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे जिऱ्याच्या मदतीने तुम्ही वजनही कमी करू शकता. चला जाणून घेऊ ते कसं?

जिऱ्यात फार कमी कॅलरी असतात. त्यासोबतच यात अॅँटी-इनफ्लेमेटरी गुणही असतात. याने मेटाबॉलिज्मही सुधारतं. जिऱ्यामध्ये थायमोक्विनोन नावाचं एक तत्त्व असतं. याने शरीरातील फ्री रॅडिक्लसवर हल्ला केला जातो आणि त्यांना शरीरातून बाहेर काढलं जातं.

एका रिसर्चनुसार, जर जिरं लिंबाच्या रसात मिश्रित करून सेवन केलं तर याने वजन कमी करण्यास मदत मिळते. जिरं किंवा जिऱ्यांचं पाणी सेवन केल्याने केवळ १५ ते २० दिवसात वजन कमी केलं जाऊ शकतं असा दावा अनेकजण करतात.

कसं होतं वजन कमी?

जिरं हे वेगाने कॅलरी बर्न करतं. असं करण्यासाठी जिरं मेटाबॉलिज्मची गती वाढवतं आणि पचनक्रियाही सुधारतं. जेव्हा पचनक्रिया चांगली होईल तेव्हा मेटाबॉलिज्म योग्य राहील. त्यामुळे याचा फायदा वजन कमी करण्यास होतो.

जिरं कसं वापराल?

१) २ चमचे जिरं घ्या आणि ते रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी हे जिऱ्याचं पाणी गाळून घ्या. या पाण्यात थोडा लिंबाचा रस टाका आणि सेवन करा. हे पाणी रोज रिकाम्या पोटी २ आठवडे सेवन करा.

२) एक चमचा जिरं पावडर दह्यात मिश्रित करा आणि साधारण १५ दिवस जेवण केल्यावर याचं सेवन करा.

३) एक कप पाणी उकडून त्यात एक चमचा जिरं पावडर टाका. त्यात थोडा लिंबाचा रस टाका. हे ड्रिंक रोज २० दिवस जेवण केल्यावर सेवन करा. फायदा दिसेल.

टॅग्स :Weight Loss Tipsवेट लॉस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्स