शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

केवळ दारूच नाही तर या पदार्थांच्या सेवनामुळेही खराब होते किडनी, आजच खाणं करा कमी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2022 16:24 IST

Foods that can damage your Kidneys: आयुर्वेदिक डॉक्टर अबरार मुल्तानी यांनी सांगितलं की,  काही असे पदार्थ असतात जे किडनीचं नुकसान करू शकतात. चुकीचं खाणं-पिणं आणि चुकीच्या लाइफस्टाईलमुळे किडन्यांना अनेक प्रकारच्या समस्या होतात.

Foods that can damage your Kidneys: किडनी शरीरातील छोटा पण फार महत्वाच अवयव आहे. त्यामुळेच किडनीचं आरोग्य चांगलं राहणं गरजेचं आहे. किडनीचं काम शरीरातून टॉक्सिन पदार्थ म्हणजे विषारी पदार्थ बाहेर काढणं हेच आहे. याने यूरिनचं निर्माण होण्यासोबतच ब्लड प्रेशर नियंत्रित राहण्यासाठी खास हार्मोन्सही तयार होतात. आयुर्वेदिक डॉक्टर अबरार मुल्तानी यांनी सांगितलं की,  काही असे पदार्थ असतात जे किडनीचं नुकसान करू शकतात. चुकीचं खाणं-पिणं आणि चुकीच्या लाइफस्टाईलमुळे किडन्यांना अनेक प्रकारच्या समस्या होतात.

किडनी शरीरातून यूरिनच्या माध्यमातून विषारी पदार्थ बाहेर काढण्याचं काम करतात. ज्यांच्या किडनीमध्ये समस्या असेल त्यांना त्यांच्या लाइफस्टाईल आणि आहारात बदल करावा लागतो. पण काही लोकांना किडनीत समस्या असल्याचं उशीरा समजतं ज्यामुळे त्यांना डायलिसिस करावं लागतं.

किडनी खराब झाल्याची सुरूवातीची लक्षणं

- भूक कमी लागणे

- शरीरावर सूज

- जास्त थंडी वाजणे

- त्वचेवर रॅशेज

- लघवी करताना त्रास

- चिडचिडपणा

किडनीचं नुकसान करणाऱ्या 5 गोष्टी

1. दारू 

जास्त मद्यसेवन केलं तर किडनी खराब होतात. जास्त मद्यसेवन केल्याने किडनींची क्रिया योग्यपणे होण्यास समस्या होते. याचा प्रभाव तुमच्या मेंदूवर पडतो. मद्यसेवनाने केवळ किडनीचंच नाही तर शरीरातील वेगवेगळ्या अवयवांचं देखील नुकसान होतं.

2. मीठ

मिठात सोडिअम असतं, हे पोटॅशिअमसोबत मिळून शरीरात फ्लूडचं प्रमाण योग्य ठेवतं. पण आहारातून जर जास्त मीठ खाल्लं गेलं तर फ्लूडचं प्रमाण वाढतं. ज्याने किडनीवर जास्त दबाव पडतो आणि नुकसान होतं.

3. डेअरी प्रॉडक्ट्स

दूध, चीज, पनीर, बटरसारखे डेअरी प्रॉडक्ट्सचं जास्त सेवन करणं किडनीसाठी चांगलं नाही. डेअरी प्रॉडक्ट्समध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त असतं. ज्याने किडनीला नुकसान पोहोचतं. डेअरी प्रॉडक्ट्समध्ये कॅल्शिअमही जास्त प्रमाणात असतं. ज्याने किडनी स्टोनची समस्या होऊ शकते. त्यामुळे यांचं जास्त सेवन करू नका.

4. रेड मीट

रेड मीटरमध्ये प्रोटीन फार जास्त असतं. प्रोटीन आपल्या शरीरासाठी गरजेचंही असतं. पण अशाप्रकारचं मांस पचवणं आपल्या शरीरासाठी अवघड असतं. ज्याचा प्रभाव किडनीवर पडतो.

5. आर्टिफिशियल स्वीटनर

बाजारात मिळणाऱ्या मिठाई, कुकीज आणि ड्रिंक्समध्ये आर्टिफिशिअल स्वीटनर जास्त प्रमाणात असतं. जे किडनीच्या आरोग्यासाठी नुकसानकारक आहे. जे लोक डायबिटीसचे रूग्ण आहेत, त्यांना किडनीसंबंधी आजार होण्याचा धोका जास्त राहतो. अशा लोकांनी याचं सेवन करू नये.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य