शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कानातून मळ काढण्यासाठी इअरबर्ड्स वापरताय का? या चूका केल्यास व्हाल कायमचे बहिरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2021 18:31 IST

जाणून घ्या की, इअर बर्ड्स तुमच्या कानासाठी किती हानिकारक आहेत. जर तुम्ही देखील त्यांचा वापर करत असाल तर तुम्हाला त्यांचा काळजीपूर्वक वापर करणे आवश्यक आहे.

आपण बऱ्याचदा आपले कान साफ करण्यासाठी माचिसच्या काडीचा वापर करतो किंवा एखादं पिन वैगरे कानात घालतो. परंतु ही कान साफ करण्याची चूकीची तसेच खूप धोकादायक पद्धत आहे. लोकांना आता या गोष्टीची माहिती झाली आहे, ज्यामुळे काही लोक आता कान साफ करण्यासाठी इअर बर्डचा वापर करतात. हे इअर बर्ड हे प्लॅस्टीक किंवा लाकडाचे असते, ज्यावर कापुस गुंडाळलेला असतो.

यावर कापुस गुंडाळला असल्याने आपल्याला कानात काही इजा होणार नाही किंवा याचा त्रास होणार नाही असे आपल्याला वाटत जरी असले, तरी असे करणे देखील धोक्याचे ठरु शकते. हे इअर बर्ड्स तुमच्या कानात मॅचस्टिकसारखेच काम करतात. यामुळे तुमच्या कानालाही इजा होऊ शकते.

त्यामुळे अशा स्थितीत जाणून घ्या की, इअर बर्ड्स तुमच्या कानासाठी किती हानिकारक आहेत. जर तुम्ही देखील त्यांचा वापर करत असाल तर तुम्हाला त्यांचा काळजीपूर्वक वापर करणे आवश्यक आहे.

लोकं काय करतात?खरं तर, लोक त्यांच्या कानातून घाण बाहेर काढण्यासाठी इअर बर्ड्स वापरतात. यासाठी ते सतत कानात बर्ड्स घालतात आणि शक्य तितक्या आत त्यांना घालताता. लोकांना असे वाटते की, असे केल्याने त्यांचे कान पूर्णपणे साफ होईल पण, असे करणे तुम्हाला खूप महागात पडू शकते. असे केल्याने तुमच्या कानातील वॅक्स बाहेर तर येत नाही आणि उलट तुम्हाला यामुळे अधिक समस्या येऊ शकतात.

इअर बर्ड्स धोकादायक का आहेत?अनेक अहवालांमध्ये हे उघड झाले आहे की, कापसाचे बर्ड वापरल्याने तुम्हाला थोडा आराम मिळू शकतो, पण त्यामुळे कानाचा वॅक्स निघत नाही. हे इअर बर्ड्स ते वॅक्स काढून टाकण्याऐवजी, त्याला आणि घाणीला पुन्हा आत ढकलते. यामुळे हे मेण कानाच्या ड्रम किंवा कर्णमालाच्या जवळ जाते आणि त्यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते.

अभ्यासात असे म्हटले गेले आहे की, जेव्हा तुमच्या कानात वॅक्स जास्त असते तेव्हा ते तुमचे कान स्वतःच स्वच्छ ठेवते. त्यामुळे यासाठी तुम्हाल इअर बर्ड्स वापरण्याची गरज नाही.

मग काय केलं पाहिजे?अशा परिस्थितीत जर तुम्ही आंघोळ करताना तुमचे कान स्वच्छ केलेत तर ते जास्त चांगले ठरेल. कानातील वॅक्स देखील आपल्या कानासाठी खूप फायदेशीर आहे, जे इतर संसर्गांना प्रतिबंधित करते. तसेच, हे कानासाठी एक प्रकारचे जाळे म्हणून काम करते, म्हणून त्याची उपस्थिती आपल्या कानासाठी देखील आवश्यक आहे.

जर तुम्हाला यासंबाधीत काही समस्या येत असतील, तर तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधा.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स