शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

खरंच जास्त एक्सरसाइज केल्यानेही केसगळीतीची समस्या होते का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2023 17:08 IST

Hair fall Reason : अनेकांना असाही प्रश्न पडतोय की, जास्त एक्सरसाइज केल्यानेही केसगळती होते का? चला जाणून घेऊ याचं उत्तर...

Hairfall Reason : अलिकडे कमी वयातच अनेकांना केसगळती किंवा टक्कल पडण्याची समस्या होते. याची कारणेही वेगवेगळी असतात. जी व्यक्तीनुसार आणि त्यांच्या लाइफस्टाईलनुसार बदलतात. त्यामुळे लोक वेगवेगळे उपाय करत राहतात. पण काहींना याचा फायदा होतो तर काहींना होत नाही. अनेकांना असाही प्रश्न पडतोय की, जास्त एक्सरसाइज केल्यानेही केसगळती होते का? चला जाणून घेऊ याचं उत्तर...

३.५ कोटी पुरूषांना ही समस्या

मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतात जवळपास ३.५ कोटींपेक्षा जास्त पुरूषांना केसगळतीची समस्या आहे. फिटनेस इंडस्ट्रीमध्येही अनेकांना डोक्यावर केस कमी आहेत किंवा टक्कल आहेत. त्यामुळे आज आपण जाणून घेऊया की, एक्सरसाइज केल्यानेही केसगळतीची समस्या होते का?

काय आहे सत्य?

एका वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, एक्सरसाइज करताना केसगळतीची समस्या होणे सामान्य बाब आहे. मुळात केसगळतीचं किंवा टक्कल पडण्याचं मुख्य कारण डायहायड्रोटेस्टोस्टेरॉनचं असंतुलित झालेलं प्रमाण आहे. याचं प्रमाण टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण जास्त झल्यावर वाढतं. दुसरीकडे हेही खरं आहे की,  बॉडी बिल्डर किंवा एथलिट टेस्टोस्टेरॉन बूस्टर किंवा सप्लिमेंट्सचा वापर करून टेस्टोस्टेरॉन हाय करण्याचा प्रयत्न करतात. टेस्टोस्टेरॉन वाढलं तर डायहायड्रोटेस्टोस्टेरॉनचं प्रमाण वाढतं आणि केसगळती होऊ लागते.

मुख्य कारणांपैकी एक

रिसर्चनुसार, केसगळतीला लो कार्ब डाएट घेणंही कारणीभूत असतं. वजन कमी करण्यासाठी लोक कार्बोहायड्रेट आहारातून कमी घेतात. एका रिसर्चमध्ये ४५ लोकांना लो-कार्ब डाएट देण्यात आली. यातील २ लोकांमध्ये केस पातळ होणे आणि केसगळतीची समस्या बघण्यात आली.

उपाय

जर एखाद्या व्यक्तीचे केस बूस्टर किंवा स्टेरॉइड घेतल्याने पातळ होतात किंवा गळत असतील तर त्यांनी याचं सेवन बंद केलं पाहिजे. तसेच वेळीच एक्सपर्टचा सल्ला घ्यावा. तसेच आहार आणि लाइफस्टाईलमध्ये बदल करूनही तुम्ही केसगळतीची समस्या दूर करू शकता.

टॅग्स :Hair Care Tipsकेसांची काळजीHealth Tipsहेल्थ टिप्स