शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल बाहेर काढतील या सवयी, हृदयविकार, स्ट्रोक राहतील दूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2022 15:44 IST

उच्च एलडीएलमुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक सारख्या समस्या उद्भवू शकतात, परंतु जीवनशैलीत काही छोटे बदल करून तुम्ही या समस्या टाळू शकता. चला जाणून घेऊया.

बहुतेक लोकांचा असा विश्वास आहे की कोलेस्टेरॉलच्या जास्त सेवनाने आरोग्यावर वाईट परिणाम होतो आणि ते खूप हानिकारक आह. परंतु हे पूर्णपणे बरोबर नाही. कारण कोलेस्ट्रॉलचे अनेक फायदे देखील आहेत, जे शरीरासाठी खूप महत्वाचे आहे.

शरीरातील हार्मोन्स वाढवण्यासोबतच लिव्हरमध्ये पित्त रस तयार करण्यासाठी आणि शरीरातील पेशी सुरक्षित ठेवण्यासाठी कोलेस्टेरॉल खूप फायदेशीर आहे. कोलेस्टेरॉलचे दोन प्रकार आहेत, एलडीएल म्हणजे वाईट कोलेस्ट्रॉल आणि एचडीएल म्हणजे चांगले कोलेस्ट्रॉल. उच्च एलडीएलमुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक सारख्या समस्या उद्भवू शकतात, परंतु जीवनशैलीत काही छोटे बदल करून तुम्ही या समस्या टाळू शकता. चला जाणून घेऊया.

तणाव घेणे टाळासेंट ल्यूक हेल्थ डॉट ओआरजीच्या मते, तणावामुळे कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते आणि त्याचा परिणाम हार्मोनल संतुलनावरही होतो. चिंता आणि तणावापासून दूर राहणे शरीरातील एचडीएल कोलेस्टेरॉलची पातळी वाढवून एलडीएल कोलेस्टेरॉल कमी करण्यास उपयुक्त ठरू शकते.

धूम्रपान टाळातुम्ही कोणत्याही व्यसनापासून दूर राहा. ते आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असतात आणि कर्करोगासारख्या अनेक आजारांना जन्म देतात. ते फुफ्फुसांनादेखील खराब करतात आणि एलडीएल कोलेस्टेरॉलसाठी उपयुक्त ठरतात. धूम्रपान सोडल्याने कोलेस्टेरॉलची पातळी कमी होण्यासोबतच इतर आजारांचा धोकाही कमी होऊन शरीर निरोगी बनते.

पौष्टिक आहार घ्याबीन्स, नट, एवोकॅडो, फळे, भाज्या, ओट्स, मासे यासारखे निरोगी पदार्थ खा. जे एचडीएल कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढवतात. तसेच कोलेस्ट्रॉलमुळे रक्ताभिसरणात होणाऱ्या समस्यादेखील प्रतिबंधित होतात. निरोगी खाण्यासोबतच तळलेले आणि जास्त चरबीयुक्त पदार्थांपासून दूर राहणे आवश्यक आहे.

नियमित व्यायाम कराजॉगिंग, सायकलिंग, दोरीच्या उड्या मारणे यासारख्या व्यायामांचा तुमच्या दैनंदिन दिनचर्येत समावेश करा. ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि एचडीएल कोलेस्ट्रॉल वाढते. नियमित व्यायामामुळे हृदयही निरोगी राहते.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स