शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

या सवयींमुळे तुम्हाला होऊ शकतो डायबिटीस, वेळीच व्हा सावध!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2022 10:15 IST

Diabetes Causes : टाइप 2 डायबिटीस तुमच्या चुकीच्या सवयीतून तुम्हाला मिळतो. कोणत्याही आजारापासून वाचण्यासाठी आधी त्याची कारणं जाणून घेणं फार गरजेचं असतं. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला डायबिटीसच्या कारणांबाबत सांगणार आहोत. 

Diabetes Causes :  भारतात डायबिटीसचा समावेश कॉमन आजारांमध्ये झाला आहे. डायबिटीसच्या रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. डॉक्टर सांगतात की, इतक्या वेगाने डायबिटीसच्या रूग्णांची संख्या वाढण्याचं कारण लोकांची सुस्त लाइफस्टाईल, चुकीचं खाणं-पिणं आणि काही चुकीच्या सवयी आहेत. आकडेवारीनुसार, देशात जवळपास 7.7 कोटी लोक या आजाराने पीडित आहेत आणि ही संख्या दररोज वाढत आहे. टाइप 1 डायबिटीस हा जेनेटिक असतो, जो तुम्हाला परिवाराकडून मिळतो. पण टाइप 2 डायबिटीस तुमच्या चुकीच्या सवयीतून तुम्हाला मिळतो. कोणत्याही आजारापासून वाचण्यासाठी आधी त्याची कारणं जाणून घेणं फार गरजेचं असतं. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला डायबिटीसच्या कारणांबाबत सांगणार आहोत. 

सुस्त लाइफस्टाईल

आराम करायला तर सर्वांनाच आवडतं. सगळ्यांना सोफ्यावर किंवा बेडवर लेटून टीव्ही बघावी वाटते किंवा वेबसीरीज बघाव्या वाटतात. पण हा असा जास्त वेळ केलेला आराम तुमच्यासाठी फार नुकसानकारक आहे. जास्त वेळ बसून राहिल्याने किंवा लेटल्याने, कोणतीही शारीरिक हालचाल न केल्याने, फुप्फुसांवर वाईट प्रभाव पडतो. रिसर्चमधून समोर आलं आहे की, टाइप 2 डायबिटीसचा धोका अशा लोकांना जास्त असतो जे लोक दिवसभर बसून राहतात किंवा लेटून राहतात.

हाय कॅलरी आहार

जास्त प्रमाणात कॅलरींचं सेवन केल्याने वजन वाढतं आणि टाइप 2 डायबिटीसचा धोकाही होतो. कोणतीही व्यक्ती दिवसा जेवढं काम करतो तेवढ्याच प्रमाणात कॅलरीचं सेवन केलं पाहिजे. जर एखादी व्यक्ती असं काही काम करतो ज्यात शारीरिक हालचाल नाही. अशांनी कमी कॅलरीचा आहार घेतला पाहिजे.

एक्सरसाइज न करणं

अनेक रिसर्चमधून समोर आलं आहे की, एक्सरसाइज केल्याने शरीराचं श्वसन तंत्र चांगलं राहतं. पण जर तुमच्या परिवारात कुणाला डायबिटीस असेल तर एक्सरसाइज करून याचा धोका कमी केला जाऊ शकतो. अशा लोकांमध्ये डायबिटीसची लक्षणे उशीरा दिसू लागतात, इतकंच नाही तर याने रूग्णांमध्ये शुगर लेव्हल कंट्रोल ठेवण्यास मदत मिळते. त्यामुळे सर्वांनी आठवड्यातून कमीत कमी 150 मिनिटे किंवा पाच दिवस एक्सरसाइज करावी.

मद्यसेवन आणि धुम्रपान

जास्त धुम्रपान आणि मद्यसेवनाचा थेट संबंध हृदयरोग, हाय कोलेस्ट्रॉल, हाय ब्लड प्रेशर आणि डायबिटीसशी आहे. धुम्रपानाने ब्लड वेसल्सवर प्रभाव पडतो आणि धमण्या आकुंचन पावतात. ज्यामुळे हार्ट अटॅकचा धोका असतो. यामुळे डायबिटीसचा धोकाही वाढतो. जास्त मद्यसेवन केल्याने फॅटी लिव्हर ची समस्या सुरू होते, जी पुढे जाऊन डायबिटीसचं कारण ठरते. 

पोषणाची कमतरता

आवश्यक मॅक्रो आणि मायक्रो न्यूट्रिएट्सच्या कमतरतेमुळे अनेक आजार होतात आणि याने पूर्ण आरोग्य बिघडतं. अनेक रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, पालेभाज्या, वीगन आणि मेडीटेरियन डायट डायबिटीसचा धोका टाळू शकतात. सोबत बऱ्याच काळापासून व्हिटॅमिन डी ची कमतरता असले तर डायबिटीसचा धोका वाढतो. प्रोटीन, फायबर, आवश्यक फॅट्स आणि कार्बोहायड्रेट्स असलेला आहार घेतला तर शरीरात ब्लड शुगर लेव्हल आणि इन्सुलिनचं प्रमाण कंट्रोलमध्ये राहतं.

लठ्ठपणा

लिव्हर आणि शरीरात जमा होणाऱ्या फॅटला, विसरल फॅट म्हटलं जातं. ज्याचा इन्सुलिन रेजिस्टेंससोबत संबंध आढळून आला आहे. यामुळे व्यक्तीचं वजन वाढू लागतं. ज्यामुळे पुढे जाऊन त्यांना डायबिटीस होऊ शकतो. तसेच लोअर बॉडी इंडेक्स असलेल्या लोकांनाही डायबिटीसचा धोका राहतो.

तणाव

तणाव शरीर आणि मेंदूच्या क्रियामध्ये गडबड करतो. ज्यामुळे लठ्ठपणा, इन्सुलिन रेजिस्टेंस आणि डायबिटीसचा धोका वाढतो. झोपेच्या कमतरतेमुळेही ही समस्या वाढू शकते. त्यामुळे एक्सरसाइज, मेडिटेशन आणि पौष्टिक आहार घेऊन तणाव दूर करावा.

टॅग्स :diabetesमधुमेहHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य