शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

ब्रश करताना ही समस्या झाली तर तुम्हाला असू शकतो फॅटी लिव्हर डिजीज, वेळीच व्हा सावध

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2023 09:32 IST

Sign of fatty liver disease: सिरोसिस फॅटी लिव्हर डिजीजची सगळ्यात गंभीर स्थिती आहे. ही स्थिती लिव्हरवर अनेक वर्ष सूज राहिल्यानंतर येते. ज्यामुळे लिव्हरवर गाठ तयार होते.

Sign of fatty liver disease:  फॅटी लिव्हर डिजीज (Fatty liver disease) एक अशी समस्या आहे ज्यात व्यक्तीच्या लिव्हरवर फॅट जमा होतं. यात लिव्हरचा आकार वाढू लागतो. ही समस्या त्या लोकांमध्ये अधिक बघायला मिळते जे अधिक मद्यसेवन करतात किंवा ज्यांचं वजन जास्त आहे. पण आजार इतरांनाही होऊ शकतो. या आजाराचे दोन प्रकार आहेत एक म्हणजे अल्कोहोलिक लिव्हर सिरोसिस (Alcoholic liver cirrhosis) जो दारूमुळे होतो आणि दुसरा म्हणजे नॉन-अल्कोहोलिक लिव्हर सिरोसिस (Non-alcoholic liver cirrhosis) जो जास्त वजनामुळे होतो.

सिरोसिस फॅटी लिव्हर डिजीजची सगळ्यात गंभीर स्थिती आहे. ही स्थिती लिव्हरवर अनेक वर्ष सूज राहिल्यानंतर येते. ज्यामुळे लिव्हरवर गाठ तयार होते. जास्त काळ लिव्हर खराब राहिल्याने लिव्हरमध्ये हेल्दी टिश्यू ऐवजी डॅमेज टिश्यू तयार होतात. यामुळे लिव्हर बरोबर काम करत नाही. सिरोसिसमुळे होणारं डॅमेज पुढे जाऊन लिव्हर फेलिअरचं कारण बनतं. आज आम्ही तुम्हाला काही संकेत सांगणार आहोत, जे याकडे इशारा करतात की, तुम्हाला फॅटी लिव्हर डिजीज आहे.

हिरड्यांमधून रक्त

दात ब्रश करताना जर हिरड्यांमधून सहजपणे रक्त येत असेल तर हा याचा संकेत असू शकतो की, तुम्ही फॅटी लिव्हरचा आजार आहे. कारण हा आजार रक्त वाहण्याचं किंवा सहजपणे जखम होण्याचं कारण ठरू शकतो. त्याशिवाय सतत नाकातून रक्त येणंही फॅटी लिव्हर डिजीजचा संकेत होऊ शकतो.  नॉन-अल्कोहलिक लिव्हर सिरोसिसचा दात तुटणे आणि पेरियोडोंटायटिससोबतही संबंध आहे. हेल्दी लाइफस्टाईल फॉलो करून हा आजार अधिक वाढण्यापासून रोखू शकता.

फॅटी लिव्हर डिजीजची इतर लक्षण

थकवा - सामान्यपणे फॅटी लिव्हर डिजीजच्या रूग्णांना सतत थकवा जाणवतो.

त्वचेवर पिवळेपणा - फॅटी लिव्हरमुळे त्वचा आणि नसांमध्ये पिवळेपणा किंवा पांढरेपणा दिसू शकतो.

पोटात वेदना - फॅटी लिव्हर डिजीज असलेल्या लोकांना पोटात दुखण्याची समस्या होऊ शकते.

उलटी - हा आजार असलेल्या लोकांना अनेकदा उलटीचा अनुभव येऊ शकतो.

तिळ-चट्टे - फॅटी लिव्हर डिजीजच्या रूग्णांमध्ये त्वचेवर तिळ-चट्टे, खाजही येऊ शकते.

अपचन - फॅटी लिव्हर डिजीजच्या रूग्णांना अपचन, हाय ब्लड प्रेशर आणि डायबिटीससारख्या समस्याही होऊ शकतात.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य