शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Gular Benefits: 5 गंभीर आजारांना दूर करण्यास मदत करतं हे फळ, आयुर्वेदात आहे फार महत्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2023 10:58 IST

Gular Tree Benefits: उंबराचं झाड एक औषधी झाड मानलं जातं. उंबरांवर करण्यात आलेल्या शोधात सांगण्यात आलं आहे की, यात अ‍ॅंटी-पायरेटीक, अ‍ॅंटी इन्फ्लामेटरी, अ‍ॅंटी-मायक्रोबियल, अ‍ॅंटी-डायबिटीक इत्यादी गुण असतात.

Gular Tree Benefits: कोणताही आजार हा सांगून येत नाही. तर 5 असे गंभीर आजार आहेत जे एकदा झाले तर लवकर बरे होत नाहीत. या आजारांवर उपचार करण्यासाठी पाण्यासारखा पैसा लावावा लागतो. पण आयुर्वेद या गंभीर आजारांचा उपाय म्हणून उंबरांकडे बघतं. याचा दावा काही शोधांमध्येही करण्यात आला आहे.

उंबराचे फायदे

उंबराचं झाड एक औषधी झाड मानलं जातं. उंबरांवर करण्यात आलेल्या शोधात सांगण्यात आलं आहे की, यात अ‍ॅंटी-पायरेटीक, अ‍ॅंटी इन्फ्लामेटरी, अ‍ॅंटी-मायक्रोबियल, अ‍ॅंटी-डायबिटीक इत्यादी गुण असतात. उंबराची डायबिटीस, लिव्हर डिसऑर्डर, पाइल्स, डायरिया आणि फुप्फुसासारख्या गंभीर आजारात मदत होते.

डायबिटीसचा देशी उपचार

काही रिसर्चमधून समोर आलं आहे की, उंबराचं झाड ब्लड ग्लूकोज कमी करण्यास मदत करतं. डायबिटीसचे रूग्ण वजन कंट्रोल करण्यासाठीही याचा वापर करू शकतात. पण ठोस पुराव्यांसाठी यावर आणखी शोध होणं बाकी आहे.

लिव्हर डिसऑर्डर

आयुर्वेदात उंबराला लिव्हरचा आजार ठीक करण्यासाठी वापरलं जातं. याच्या पानांच्या रसात लिव्हर डॅमेज कमी करण्याचे गुण असतात. लिव्हर हेल्दी ठेवण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो.

पाइल्सवर उपाय

पाइल्समध्ये मलद्वारांच्या नसांमध्ये सूज येते. ही समस्या गंभीर झाली तर त्यातून रक्तही येऊ शकतं. पण उंबरातील अ‍ॅंटी-इन्फ्लामेटरी गुण या आजाराला दूर करण्यास मदत करतात.

डायरिया

अभ्यासकांनी डायरियाच्या समस्येत उंबरांची भूमिका जाणून घेण्यासाठी रिसर्च केला. त्यांनी मुद्दामहून आधी डायरियाची समस्या निर्माण केली आणि नंतर उंबराच्या पानांच्या रसाचा वापर केला. याचे परिणाम सकारात्मक आणि डायरियापासून आराम देणारे मिळाले.

फुप्फुसाची समस्या

रेस्पिरेटरीमध्ये इन्फेक्शन झाल्यावर खोकला, श्वास भरून येणे, श्वास घेताना शिटी वाजल्यासारखा आवाज येणे यांसारखी लक्षण दिसतात. ही लक्षणं मॅनेज करण्यात उंबरांची मदत मिळते. याच्या वापरासाठी एखाद्या आयुर्वेदिक एक्सपर्टची मदत घेऊ शकता.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य