शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

....तर जग कोरोना व्हायरसला कधीच हरवू शकणार नाही; WHO ची धोक्याची सुचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 12:39 IST

१० लाख रुग्ण संख्या होण्यासाठी ३ महिन्यांचा कालावधी लागला. पण आता १० लाख  रुग्ण समोर येण्यासाठी ८ दिवसांचा कालावधी पुरेसा आहे.

(image credit- The week)

कोरोना व्हायरसचा प्रसार जगभरात झपाट्याने वाढत आहे. भारतातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४ लाखांपेक्षा जास्त आहे. दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने जगभरातील नेत्यांना कोरोना व्हायरसच्या संकटाच्या काळात राजकारण न करण्याचा सल्ला दिला आहे.  जागतिक आरोग्य संघटनेने या लढाईविरुद्ध एकजूटीने काम करण्याचे आवाहन केले आहे. WHO चे प्रमुख टेड्रोस एडहॅनम घेब्रियेसुस यांनी सोमवारी सांगतले की, कोरोना माहामारीचा प्रसार वेगाने वाढत आहे. रोज नवीन रुग्णांची संख्या समोर येत आहे. 

टेड्रोस यांनी सांगितले की, १० लाख रुग्ण संख्या होण्यासाठी ३ महिन्यांचा कालावधी लागला. पण आता १० लाख  रुग्ण समोर येण्यासाठी ८ दिवसांचा कालावधी पुरेसा आहे. सध्याच्या काळात सगळ्यात मोठा धोका हा कोरोना व्हायरसपासून नाही तर जागतिक स्तरावरील एकजूट कमी असल्यामुळे आहे. एकजूटीचा अभाव असल्यास आपण कोरोनाच्या माहामारीचा सामना करू शकत नाही.

जागतीक स्तरावर माहामारीचा प्रसार वाढत आहे. WHO चे डेविड नेब्ररो यांनी सांगितले की, जगभरातील लोकांना कोरोना व्हायरसची लस मिळण्यासाठी दीड वर्षाचा कालावधी लागू शकतो. जर या वर्षाच्या शेवटापर्यंत लस यशस्वीरित्या तयार झाली तरी सुरक्षा आणि लसीबाबात अन्य तपासण्या करण्यासाठी वेळ लागू शकतो. त्यानंतर मोठ्या प्रमाणात लस तयार करण्याचेही आव्हान ठरणार आहे.   कोविड 19 चा वाढता प्रसार हा टेस्टिंगचे प्रमाण वाढवल्यामुळे होत आहे असं म्हणता येणार नाही. कोरोनाची वाढती रुग्ण संख्या पाहता व्हायरस आता जगभरात व्हायरस तळ ठोकून बसला आहे. 

सध्या कोरोना रुग्णांच्या बचावासाठी गंभीर आजारात वापरात असलेल्या औषधांचा वापर केला जात आहे. लॉकडाऊन शिथिल करून देशातील जनजीवन आणि अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न सरु असतानाच बाधितांची संख्या वाढत चालल्याने नागरिकांच्या चिंतेतही भर पडत आहे. याआधीही जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अधनोम घेब्रेसिस यांनी कोरोना साथ पुन्हा मोठ्या प्रमाणावर फैलावण्याचा धोका असल्याने सर्व देश व तेथील नागरिकांनी अतिशय सावध राहिले पाहिजे. अशी माहिती दिली होती. 

दिलासादायक! भारतातील 'ही' कंपनी तयार करणार कोविड 19 चे जेनेरिक औषध

कोरोनाच्या माहामारीत पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आजारांपासून 'असा' करा बचाव; जाणून घ्या उपाय

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना