शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
4
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
5
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
6
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
7
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
8
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
9
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
10
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
11
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
12
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
13
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

हाताला गाठ लागली, काय कराल?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2018 9:49 AM

स्वत:कडे दुर्लक्ष, संकोच, आर्थिक चिंता या चक्रात कॅन्सर गाठतो तेव्हा..

- डॉ. निष्ठा पालेजाआमच्याकडेही ग्रामीण भागातून स्तनांचा कर्करोग झालेल्या महिला रुग्ण येतात त्या आजार तिसऱ्या टप्प्यात गेल्यानंतरच. स्तनाची गाठ मानेपर्यंत पसरलेली असते. स्तनाच्या त्वचेला जखमा झालेल्या असतात. अशा टप्प्यात केवळ उपचाराचा कालावधी आणि खर्चच वाढतो असं नाही तर उपचाराची तीव्रताही वाढते. त्याउलट लवकर निदान झालं तर एका छोट्या आॅपरेशननंही महत्त्वाचं काम होऊ शकतं. मात्र आजार तिसºया टप्प्यात पोहचतो तेव्हा रेडिएशन, ते नको असेल तर स्तन काढून टाकणं यासह बरीच मोठी उपचार प्रक्रिया करावी लागते.आजार एवढा वाढल्यावर का आल्या असं या ग्रामीण भागातील महिलांना विचारतो. मात्र त्या जे सांगतात त्यातून आजाराविषयी माहितीचा अभाव आणि स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करण्याची मानसिकताच समोर येते.

स्वत:च्या स्तनांची तपासणी स्वत: करणं हे ग्रामीण भागातल्या महिलांना माहिती नसतं त्यामुळे आपल्या लेकीबाळींना यासंदर्भात चार शहाणपणाच्या गोष्टीही त्या सांगू शकत नाही.दुसरी गोष्ट म्हणजे बायकांचा स्वत:च्या आरोग्याकडे बघण्याचा दुय्यम दृष्टिकोन. आधी घरातल्यांचं, मुलाबाळांचं, नव-याचं, सासूसासºयांचं करून मग वेळ उरला तर बाई स्वत:कडे पाहते. स्वत:च्या दुखण्या-खुपण्याकडे बारकाईनं बघण्याची मानसिकताच नाही. त्यातून स्तनात न दुखणारी गाठ लागली तर तिचा काही त्रास नाही म्हणून सर्रास दुर्लक्ष होतं. आणि गाठ हाताला लागली तर ती कॅन्सरची असेल या भीतीनंही डॉक्टरकडे जाण्याचा संकोच. स्तनासारखी अवघड जागा डॉक्टरांना कशी दाखवावी (महिला डॉक्टरलाही) अशी लाजही वाटते. पैशांची चणचण, मुलांचं शिक्षण यांसारख्या आर्थिक अडचणीही असतातच.

यासर्व कारणांमुळे ग्रामीण भागातील महिलांना आपला आजार घेऊन डॉक्टरांपर्यंत पोहचायला बराच उशीर झालेला असतो. आधीच स्वत:च्या खाण्यापिण्याकडे केलेल्या दुर्लक्षामुळे ग्रामीण भागातील महिलांमध्ये पोषक मूल्यांची मोठी कमतरता असते. त्यात किमोथेरेपी सुरू केल्यानंतर विशिष्ट आहार घेण्याकडेही त्यांचा कल नसतो. एकतर त्रास होतो म्हणून खाणार नाही नाहीतर मिळेल ते खाणार यामुळे अजूनच शरीरात कमतरता निर्माण होतात. याच कारणामुळे ग्रामीण भागातील महिलांमध्ये कर्करोग रिकरन्सची शक्यता खूप दाट असते.

थोडी जागरूकता ठेवली, स्तनांचं स्वपरीक्षण शिकून घेतलं, त्यातलं गांभीर्य ओळखलं तर खूप उशिराच्या टप्प्यावर जाऊन आजाराशी लढाई लढावी लागणार नाही. वैद्यकीय यंत्रणेनं ग्रामीण भागातील, वाड्यापाड्यातील महिलांपर्यंत पोहचणं जितकं गरजेचं आहे तितकंच या महिलांनीही आपल्या मनातला संकोच बाजूला सारून स्वत:साठी म्हणून डॉक्टरांकडे येणंही गरजेचं आहे.(संचालक, क्लिनिकल रिसर्च एचएससी मानवता कॅन्सर सेंटर, नाशिक) 

टॅग्स :cancerकर्करोग