तोंड आलंय? TRY THIS..
By Admin | Updated: May 24, 2017 18:14 IST2017-05-24T18:13:10+5:302017-05-24T18:14:02+5:30
उन्हाळ्यात तोंड येण्याचा त्रास वाढतो तेव्हा करायचं काय?

तोंड आलंय? TRY THIS..
- नितांत महाजन
उन्हाळ्यात अनेकांचं तोंड येतं, तोंडात जखमा होतात, फोड येतात. गिळता येत नाही, जेवणाचे हाल होतात, आग होते. त्रस्त होतात अनेकजण. अशावेळी काय करायचं? डॉक्टरकडे तर जायलाच हवं, सल्ला घ्यायला हवा. मात्र ते करताना घरच्या घरी आपण काही उपाय केले तर हा आजार लवकर बरा होवू शकतो.
मात्र त्यासोबत रोज पोट साफ होतंय का? पचन बरं आहे का? आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी योग्य आहेत का? हे सारं बघायला हवं. नसेल तर ते ही दुरुस्त करायला हवं.
त्यासाठी काही हे काही घरगुती उपाय
१) रोज रात्री दुध-तूप
आपलं पचन बरं नसेल तर तोंड येण्याच्या तक्रारी वाढतात. वारंवार उद्भवतात. त्यामुळे पचन योग्य हवं. रोज पोट साफ व्हायला हवं. त्यासाठी रोज रात्री जेवणानंतर, झोपण्यापूर्वी कपभर गरम दुधात चमचाभर तूप घालून घ्यायला हवं. पोट साफ होतं. तोंड येण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं.
५) मध लावणं
तोंडात मध लावणं, जेवण्यापूर्वी चमचाभर मध, चमचाभर तूप खाणं यानंही जेवताना आग कमी होते.