गॅसचा भडका होऊन विवाहिता भाजली
By Admin | Updated: July 8, 2016 21:16 IST2016-07-08T21:16:22+5:302016-07-08T21:16:22+5:30
जळगाव : स्वयंपाक करीत असताना गॅसचा भडका होऊन धरणगाव तालुक्यातील खुर्द येथील दुर्गा ईश्वर नाईक (२०) ही विवाहिता भाजली गेल्याची घटना शुक्रवारी घडली. या महिलेच्या पोटात पाच महिन्याचा गर्भ असल्याचे सांगण्यात आले असून ती ४२ टक्के भाजली आहे.

गॅसचा भडका होऊन विवाहिता भाजली
ज गाव : स्वयंपाक करीत असताना गॅसचा भडका होऊन धरणगाव तालुक्यातील खुर्द येथील दुर्गा ईश्वर नाईक (२०) ही विवाहिता भाजली गेल्याची घटना शुक्रवारी घडली. या महिलेच्या पोटात पाच महिन्याचा गर्भ असल्याचे सांगण्यात आले असून ती ४२ टक्के भाजली आहे. शुक्रवारी दुर्गा नाईक ही विवाहिता घरात स्वयंपाक करीत असताना अचानक गॅसचा भडका झाला व त्यात ती भाजली गेली. तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून येथे तिच्यावर उपचार सुरू आहे.