शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

जास्त लसूण खाणं ठरू शकतं घातक, जाणून घ्या लसूण खाण्याची योग्य पद्धत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2024 14:21 IST

Garlic Side Effect : सणाचे अनेक फायदे असण्यासोबतच आरोग्याला काही नुकसानही होतात. अधिक प्रमाणात लसणाचं सेवन केल्याचे जाणून घेऊया काही नुकसान...

Side effects eating raw garlic  : लसणाचा वापर रोज वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केला जातो. सोबतच लसणाचे आरोग्यालाही अनेक फायदे होतात. वेगवेगळ्या आजारांच्या उपचारासाठी याचा औषध म्हणून वापर वर्षानुवर्षे केला जातो. पण लसणाचे अनेक फायदे असण्यासोबतच आरोग्याला काही नुकसानही होतात. अधिक प्रमाणात लसणाचं सेवन केल्याचे जाणून घेऊया काही नुकसान...

त्वचेचं नुकसान

काही लोक हे चेहऱ्यावर लसणाची पेस्ट लावतात. पण हे काहींसाठी नुकसानकारक ठरु शकतं. काहींसाठी असं हे चांगलं असलं तरी काहींना यामुळे चेहऱ्यावर जळजळ होण्याचा त्रास होऊ शकतो. 

सर्जरी

लसणामुळे रक्ताचा संचार अधिक वेगाने होतो. त्यामुले सर्जरीच्या कमीत कमी दोन आठवड्यांपूर्वी लसणाचं सेवन करु नये. याने सर्जरीमध्ये अनेक अडचणी येण्याची शक्यता असते. 

ब्लीडिंग डिसऑर्डर

ताजा लसूण तुमची ब्‍लीडिंगची समस्या वाडवू शकतो. त्यामुळे ब्लीडिंग डिसऑर्डरच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी लसणाचं सेवन योग्य प्रमाणातच करायला हवं. 

हृदयासाठी घातक

अनेक संशोधनानुसार, लसूण खाल्लाने रक्तातील कोलेस्ट्रॉल स्तरात कमतरता आढळली आहे. असेही आढळले आहे की, लसणाच्या अधिक सेवनामुळे हृदय विकाराचा धक्काही आला आहे. 

पोट आणि पचनक्रियेत समस्या

कशातही मिश्रीत न करता तसाच कच्चा खाल्लेल्या लसणामुळे पोटात दुखणे, भूक कमी लागणे, गॅस, उलटी होणे, पोटात-छातीत जळजळ होणे, डायरिया अशाप्रकारच्या समस्या होऊ शकतात. 

आयुर्वेदात लसूण खाण्याची योग्य पद्धत

डॉक्टरांनी सांगितलं की, लसण कधीच अख्खा खाऊ नये किंवा गिळू नये. याच्या वापराची योग्य पद्धत याला बारीक करून किंवा कापून खाण्यात आहे. याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे यात आढळणारं तत्व एलिसिन आहे. ज्याला बारीक केल्यावरच याची शक्ती वाढते.

आयुर्वेद डॉक्टरांनी सांगितलं की, हिवाळ्यात लसूण फारच फायदेशीर ठरतो. याचं सेवन उन्हाळ्यातही करता येतं. मात्र, उन्हाळ्यात प्रमाण कमी असावं. तसेच हाय ब्लड प्रेशर, गॅस आणि पोटात जळजळसहीत इतर काही समस्या असलेल्या लोकांनी लसूण खाऊ नये. असं केल्याने त्यांची समस्या वाढू शकते आणि हॉस्पिटलमध्ये जाण्याची वेळ येऊ शकते. अशात लसणाचं सेवन काळजीपूर्वक करावं.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य