भावी डॉक्टर तुम्हीसुद्धा... तणावात? कारणे वेगवेगळी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2022 11:17 AM2022-10-09T11:17:08+5:302022-10-09T11:17:25+5:30

अलीकडेच २५ ऑगस्ट आणि २१ सप्टेंबर रोजी अनुक्रमे केईएम आणि नायर या रुग्णालयातील विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. वैद्यकीयसारखे शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना कोणत्या तणावाला सामोरे जावे लागत असेल?

Future Doctor Are you too... stressed? The reasons vary | भावी डॉक्टर तुम्हीसुद्धा... तणावात? कारणे वेगवेगळी 

भावी डॉक्टर तुम्हीसुद्धा... तणावात? कारणे वेगवेगळी 

googlenewsNext

संतोष आंधळे, विशेष प्रतिनिधी 
द्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता इतरांच्या तुलनेत नक्कीच चांगली असते. सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या या व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना एका विशिष्ट टप्प्यावर नैराश्य ग्रासते आणि त्यातून आत्महत्येसारख्या घटना घडतात. वैद्यकीय अभ्यासक्रम शिकत असताना तरुण भावी डॉक्टरांच्या आयुष्यात एवढा तणाव का निर्माण होत असावा, यामागची कारणे वेगवेगळी असली तरी इतिहासात प्रथमच राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (एनएमसी) याची गंभीर दखल घेतली आहे. गेल्या पाच वर्षांत राज्यातील सर्व मेडिकल कॉलेज आणि विद्यापीठांत किती विद्यार्थांनी आत्महत्या केल्या, त्याचप्रमाणे  किती विद्यार्थी अभ्यासक्रम अर्धवट सोडून गेले इत्यादी माहिती आयोगाने मागवली आहे. तसेच वैद्यकीय अभ्यासक्रम शिकणारे विद्यार्थी किती तास काम करतात आणि त्यांना साप्ताहिक रजा कधी दिली जाते, ही माहितीही आयोगाने मागितली आहे. ही सर्व माहिती ७ ऑक्टोबरपर्यंत आयोगाच्या कार्यालयात ई-मेलद्वारे कळविणे अपेक्षित होते. 

महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स (मार्ड), ही राज्यातील रेसिडेंट डॉक्टरांची अधिकृत संघटना. ही ५० वर्षांंपेक्षा जुनी संघटना निवासी डॉक्टरांच्या न्यायहक्कासाठी भांडत असते. दरवर्षी या संघटनेचे पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेले नवनवीन पदाधिकारी आपल्या मागण्यांचे पत्रक घेऊन संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटत असतात. 
 १४ वर्षांपूर्वी जे जे रुग्णालयात शिकणारे आणि मार्डचे अध्यक्षपद भूषविणारे  डॉ. योगानंद पाटील म्हणाले, निवासी डॉक्टर म्हणून विद्यार्थ्याला शिकण्याची भूक असतेच, मात्र तोही एक माणूसच आहे, हे विसरता कामा नये. त्यालाही भावभावना आहेत याचे भान बाळगले जाणे महत्त्वाचे आहे. सार्वजनिक रुग्णालयांशी संलग्न असणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयांत शिकणाऱ्या निवासी डॉक्टरला २४ तास काम करावे लागते. त्यात त्याची दमछाक होते. त्यालाही विरंगुळ्याची गरज असते. दिवसातील काही तास त्याला विश्रांती मिळेल का, या दृष्टीने पावले उचलण्याची गरज आहे. 

नैराश्यग्रस्तांना मदतीचा हात 
देणे गरजेचे 
एमबीबीएसचे शिक्षण घेत असताना विद्यार्थी आनंदी असणे अपेक्षित असते. वैद्यकीय अभ्यासक्रम हा इतर सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांपेक्षा वेगळा आहे. येथे विद्यार्थ्यांच्या बुद्धीचा कस लागतो. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी घरंदारं सोडून डॉक्टरी शिकण्यासाठी शहरातील महाविद्यालयांच्या वसतिगृहात राहत असतात. घरापासून दूर शहरी वातावरणात राहून वैद्यकीयसारखा विषय शिकणे तसे जिकिरीचेच असते. या तणावामुळे कधी हे विद्यार्थी एकलकोंडे बनतात. त्यांना नैराश्य येते. अशावेळी त्यांना कोणीतरी मदतीचा हात देणे अपेक्षित असते. 
- डॉ. जयेश लेले, राष्ट्रीय सरचिटणीस, इंडियन मेडिकल असोसिएशन

वेळेवर उपचार 
मिळणे आवश्यक
मेडिकलचे शिक्षण घेतेवेळी विद्यार्थ्यांना रुग्ण तपासणी, त्यांच्या चाचण्यांचे अहवाल, वॉर्डचे राउंड, अभ्यास या सर्व गोष्टींचा ताळमेळ साधावा लागतो. काही विद्यार्थी  भावनिकदृष्ट्या सक्षम नसतात. त्यांचे व्यक्तिमत्त्व अपरिपक्व असते. अशा विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात समुपदेशनाची गरज असते. माझ्या काळात आम्ही कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून विद्यार्थी स्तरावर वेगवेगळे प्रयोग राबविले होते. कुणी विद्यार्थी नैराश्यग्रस्त वाटला तर त्याची कुठेही बाहेर ओळख न होऊ देता त्याच्यावर गरजेचे उपचार किंवा समुदेशन केले जायचे. २००२ ते २०१९ या काळात केईएम रुग्णालयात एकही अशी दुर्दैवी घटना घडली नव्हती.
- डॉ. शुभांगी पारकर, मानसोपचारतज्ज्ञ आणि केईएमच्या माजी अधिष्ठाता

Web Title: Future Doctor Are you too... stressed? The reasons vary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :doctorडॉक्टर