पोलिओग्रस्तांसाठी मोफत शस्त्रक्रिया शिबीर

By Admin | Updated: October 30, 2016 22:46 IST2016-10-30T22:46:33+5:302016-10-30T22:46:33+5:30

बीदर : बीदर जिल्हा प्रशासनाच्या वतीने पोलिओग्रस्त नागरिकांसाठी मोफत शस्त्रक्रिया शिबीर ७ व ८ नोव्हेंबर रोजी शहरातील जिल्हा शासकीय रुग्णालयात आयोजित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा विकलांग कल्याण अधिकारी श्रीनिवास बल्लुरे यांनी शनिवारी दिली.

Free surgery course for polio victims | पोलिओग्रस्तांसाठी मोफत शस्त्रक्रिया शिबीर

पोलिओग्रस्तांसाठी मोफत शस्त्रक्रिया शिबीर

दर : बीदर जिल्हा प्रशासनाच्या वतीने पोलिओग्रस्त नागरिकांसाठी मोफत शस्त्रक्रिया शिबीर ७ व ८ नोव्हेंबर रोजी शहरातील जिल्हा शासकीय रुग्णालयात आयोजित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा विकलांग कल्याण अधिकारी श्रीनिवास बल्लुरे यांनी शनिवारी दिली.
शासनाच्या वतीने पोलिओमुक्तीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याच धर्तीवर कर्नाटकातील बीदर जिल्हा प्रशासनाच्या वतीने पोलिओग्रस्तांसाठी मोफत शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात येत आहे. या शिबिराचा जिल्‘ातील व परजिल्‘ातील तसेच महाराष्ट्रातील पोलिओग्रस्तांना लाभ घेता येणार आहे. शिबिरात डॉ. अदिनारायणराव आणि त्यांचे सहकारी शस्त्रक्रिया करणार आहेत. पोलिओग्रस्त व्यक्तींनी ५ नोव्हेंबरपर्यंत नावनोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अनुराग तिवारी, बलभीम कांबळे, श्रीनिवास बल्लुरे, भिमण्णा यांनी केले आहे.

Web Title: Free surgery course for polio victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.