रेडक्रॉसमध्ये मोफत अस्थिरोग निदान शिबिर
By admin | Updated: May 8, 2014 22:06 IST
नाशिक : जागतिक रेडक्रॉस दिनानिमित्त इंडियन रेडक्रॉस सोसायटी व डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय, भौतिकोपचार महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या शुक्रवारी मोफत अस्थिरोग निदान व हाडांचा ठिसुळपणा शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सदरचे शिबिर रेडक्रॉस सोसायटी येथे सकाळी १० ते १ या वेळेत होणार असून, अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. प्रशांत भुतडा हे रुग्णांची तपासणी करून मार्गदर्शन करणार आहेत. तरी सदर शिबिराचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मेजर पी. एम. भगत यांनी केले आहे.