डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात मोफत एन्जीओग्राफी योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2016 00:05 IST2016-03-13T00:05:17+5:302016-03-13T00:05:17+5:30
जळगाव- येथील डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयातर्फे माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या मोफत एन्जीओग्राफी सवलत योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत २४३ रुग्णांनी या योजनेचा लाभ घेतला तसेच ३३ रुग्णांवर मोफत एन्जीओग्राफी यशस्वी करण्यात आल्याचे रुग्णालय प्रशासनाने कळविले आहे.

डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात मोफत एन्जीओग्राफी योजना
ज गाव- येथील डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयातर्फे माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या मोफत एन्जीओग्राफी सवलत योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत २४३ रुग्णांनी या योजनेचा लाभ घेतला तसेच ३३ रुग्णांवर मोफत एन्जीओग्राफी यशस्वी करण्यात आल्याचे रुग्णालय प्रशासनाने कळविले आहे.गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय अिाण रुग्णालयातर्फे ८ मार्च जागतिक महिलादिनापासून जिल्ातील गरजू रुग्णांसाठी मोफत एन्जीओग्राफी सवलत योजना सुरू आहे. तसेच राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गतही एन्जीओप्लास्टी, बायपास सर्जरीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. आतापर्यंत ३३ रुग्णांवर एन्जीओग्राफीची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयाच्या हृदयालयात तज्ज्ञ डॉक्टरांची टिप उपलब्ध आहे. तसेच हृदयविकाराची शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांसाठी अत्याधुनिक असा अतिदक्षता विभाग कार्यान्वित असून त्याठिकाणी २४ तास नर्स अिाण निवासी डॉक्टर्स रुग्णांसाठी उपलब्ध आहे.या योजनेंतर्गत २४३ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यांना पुढील उपचारासाठी शिर्डी रुग्णालयाचा अनुभव असलेले कार्डीओलॉजीस्ट डॉ.गवळींकडून मार्गदर्शन करण्यात आले. ही योजना १४ एप्रिलपर्यंतच असल्याने रुग्णांनी लाभ घेण्यासाठी आशीष भिरुड यांच्याशी ९३७३३५०००९ आणि जावेद पटेल यांच्याशी ९८९०७४७८५२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन रुग्णालय प्रशासनाने केले आहे,एन्जीओग्राफी कोणी करावी? -डॉ.गवळीशिर्डी येथील अनुभव असलेले कार्डीओलॉजीस्ट डॉ.गवळी यांच्यामते ज्या घरात हृदयविकाराचा इतिहास असेल, कोलेस्ट्रॉल वाढलेले असेल, छातीत वेदना होत असतील, मधुमेहाचा त्रास, उच्चरक्तदाबाचा त्रास, अथवा पूर्वी एन्जीओप्लास्टी अथवा बायपास झालेल्या रुग्णांनी ठराविक कालावधीनंतर वरीलपैकी त्रास होत असल्यास तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने एन्जीओग्राफी करुन घेणे गरजेचे असते.