शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

झोपेमध्ये जर वारंवार होत असतील 'या' गोष्टी तर असू शकत गंभीर, आहेत 'या' आजाराचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 13:30 IST

निद्रातज्ज्ञांनी एक नवीन इशारा दिला आहे. ज्यामध्ये ते म्हणतात, तुमची स्वप्नं, ती लक्षात ठेवण्याची क्षमता आणि तुमची शारीरिक क्षमता याचा सहसंबंध असतो. जर झोपेतून उठल्यावर लगेचच तुमचे शरीर चलनवलन करू शकत नसेल, तोंडातून आवाज फुटत नसेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. त्याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करा.

झोपेत स्वप्न पडणं, त्यात काही गोष्टी घडणं, कधीकधी स्वप्न अर्धवट राहणं, हे सगळं काही फार मोठंसं नव्हे. याकडे फारसं लक्ष दिलं जात नाही. जेवढी गाढ झोप तेवढी जास्त स्वप्नं. पण आपण ज्याकडे दुर्लक्ष करत असू, अशा या रोजच्या स्वप्नांमध्ये काही धोक्याची सूचना असेल असं वाटलं तरी होतं का?

निद्रातज्ज्ञांनी एक नवीन इशारा दिला आहे. ज्यामध्ये ते म्हणतात, तुमची स्वप्नं, ती लक्षात ठेवण्याची क्षमता आणि तुमची शारीरिक क्षमता याचा सहसंबंध असतो. जर झोपेतून उठल्यावर लगेचच तुमचे शरीर चलनवलन करू शकत नसेल, तोंडातून आवाज फुटत नसेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. त्याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करा.

जेव्हा आपण झोपेच्या सगळ्यात गाढ टप्प्यात असतो तेव्हा आपल्याला स्वप्नं पडतात. ही स्वप्नं आपल्याला काही सांगण्याचा प्रयत्न करत असतात. बरेचसे लोक स्वप्नं विसरून जातात. फार कमी लोक कायम आपली स्वप्नं लक्षात ठेऊ शकतात. सतत स्वप्नं पडणं, स्लीप पॅरालिसीस अर्थात निद्रा पक्षाघात या सामान्य घटना आहेत. हॉर्वर्डमधील संशोधक डिड्रे बॅरेट (Harvard researcher Deidre Barrett) यांच्या निरीक्षणानुसार जर बुद्धीभ्रम अथवा निद्रा पक्षाघात जास्तवेळा होत असेल तर हा चिंतेचा विषय आहे. तुम्ही तुमच्या डॉक्टरशी त्वरीत संपर्क साधला पाहिजे. सतत झोप येण्याच्या विकाराआधीचा हा एक संकेत असू शकतो.

निद्रा पक्षाघात एक अशी घटना आहे, ती जेव्हा होते तेव्हा माणूस स्वप्नातून जागा तर होतो पण हलू शकत नाही अथवा ओरडू शकत नाही. निद्रापक्षाघात आणि मतिभ्रम अशा गोष्टी त्या लोकांमध्ये जास्त दिसतात जे नार्कोलेप्सीसारख्या झोपेशी संबंधित आजारांनी त्रस्त आहेत. मानसोपचारतज्ज्ञ एलन इसरने (Psychologist Alan Eiser) ने वॉशिंग्टन पोस्टला सांगितले होते की, आपल्याला आपल्या स्वप्नांतील घटनांचा अर्थ शोधायला हवा. त्याकडे दुर्लक्ष करू नये.

इसरच्या मते, परतपरत पडणारी वाईट स्वप्न (Recurring nightmares) माणसाच्या आयुष्यातील व्यक्तिगत तणावामुळे पडतात. ही वाईट स्वप्न अँटी डिस्पेटेंट औषधांपेक्षाही घातक असू शकतात. तर बॅरेटच्या मते, ज्या व्यक्ती रात्री जास्त काळ झोपतात त्यांची स्वप्नं लक्षात ठेवण्याची शक्यता अथवा क्षमता जास्त असते. तर जी मंडळी कमी झोप घेतात त्यांची स्मरणशक्ती कदाचित तितकीशी चांगली नसावी.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स