शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

कशाला खाता हे पदार्थ? - पावसाळ्यात प्रकृती सांभाळायची तर या गोष्टी टाळाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 15:53 IST

या काळात अरबट चरबट खाल्लं तर तब्येतीच्या कुरबुरी सुरू होणारच.

ठळक मुद्देहातगाडीवरच्या पदार्थांपासून दूर राहातेलकट पदार्थ टाळाअपचनाचा होऊ शकतो त्रासविविध आजारही लागतील पाठीशी

- मयूर पठाडेएरवी कसे आपण ‘फिट्ट’ असतो, म्हणजे फारशी काळजी घेतली नाही, तरी आपण लगेच आजारी पडतो असं नाही, पण हाच नियम पावसाळ्याला लावता येत नाही. येताजाता अरबट चरबट काहीही खाल्लं तर तुमच्या तब्येतीच्या कुरबुरी सुरू होणारच.त्यामुळे पावसाळ्यात तुम्हाला काहीही खाता येत नाही. नाहीतर हमखास आजारी पडलात म्हणून समजा. त्यासाठी खाण्यापिण्याची योग्य काळजी तर घेतली पाहिजेच, पण त्यापेक्षाही काय खाऊ नये हेदेखील तुम्ही पाहिलं पाहिजे.पावसाळ्यात काय खाऊ नये?१- पालेभाज्या-एरवी पालेभाज्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम, पण पावसाळ्यात तुमची पचनशक्ती कमी झालेली असते, त्यामुळे पावसाळ्यात पालेभाज्या जास्त प्रमाणात खाल्ल्या तर त्याचा आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो.२- हातगाड्यांवरचा ज्यूसज्यूस सगळ्यांनाच आवडतो. त्यातही फळांचा ज्यूस आरोग्यासाठी चांगला असंही सगळ्यांचं म्हणणं असतं, पण हातगाड्यांवरील ज्यूसमधील बॅक्टेरिया तुमची नक्कीच वाट लावू शकते.३- सी फूडपावसाळ्यात समुद्री माशांसारखा आहार कमीत कमी घ्यावा.४- हातगाड्यांवरील पदार्थ/चायनीज-

चायनिज पदार्थांचं आजकाल खूपच फॅड आहे. लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सारेच चायनीज फूडवर तुटून पडतात. पण उघड्यावरचे हे पदार्थ तुमची पचनशक्ती तर बिघडवतातच, पण वेगवेगळ्या आजारांनाही तुम्हाला सामोरं जावं लागू शकतं.५- न शिजवलेलं अन्नअनेकांना जेवताना सॅलड वगैरे कच्चे पदार्थ खाण्याची सवय असते, पण पावसाळ्याच्या दिवसांत हे कच्चे पदार्थ खाणं कमी केलं पाहिजे. कच्चे पदार्थ खाण्यासाठी खूपच जड असतात. त्यामुळे तसे ते खाल्लयास तुम्हाला पोटाचे विकार जडू शकतात.६- तेलकट पदार्थ-पावसाळा आणि भजी पावसाळा आणि गरमागरम पकोडे, तेलकट पदार्थ याचंही अतूट असं नातं आहे. समोर पाऊस पडत असताना असे पदार्थ चाखायला कोणालाही आवडतातच, पण त्यामुळे तुमच्या आरोग्यावर दुष्परिणाम होणार हे नक्की.