शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

जीवघेण्या ठरू शकतात भेसळयुक्त पीठाच्या चपात्या; 'असा' ओळखा बनावट अन् चांगल्या पीठातील फरक 

By manali.bagul | Updated: January 15, 2021 18:09 IST

Health food tips in Marathi : गव्हाच्या पीठाला पांढरे बनवण्यासाठी त्यात अनेकदा तांदळाच्या चुऱ्याचाही वापर केला जातो.

गव्हाचे पीठ आणि मैद्यात अनेक प्रकारचे फायबर्स आणि न्यूट्रिएंट्स असतात. हे शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते. बनावट पीठाचा वापर केल्यास आपल्याला त्यातील पोषक तत्वे मिळू शकत नाहीत. याशिवाय असे पीठ शरीरासाठीही नुकसानकारकसुद्धा ठरते. अनेकदा गव्हाच्या पीठात बोरिक पावडर, मैदा,  माती मिसळली जाते. गव्हाच्या पीठाला पांढरे बनवण्यासाठी त्यात अनेकदा तांदळाच्या चुऱ्याचाही वापर केला जातो. आज आम्ही तुम्हाला अशा टिप्स सांगणार आहोत. ज्या टिप्सचा वापर करून तुम्ही चपातीचे पीठ चांगले आहे की भेसळयुक्त हे ओळखू शकता. 

पीठ मळताना असं ओळखा भेसळयुक्त पीठ

चांगल्या पीठाची पारख तुम्ही मळताना करू शकता. जर तुम्ही चांगले पीठ मळत असाल तर ते खूप मऊ असते. तसंच या पीठापासून तयार केलेल्या चपात्या चांगल्या फुगतात.

भेसळयुक्त पीठाला मळण्यासाठी खूप कमी पाणी लागतं. चपात्यांचा रंग जास्त पांढरा असतो. या पीठाची चपाती व्यवस्थित फुग नाही. एखाद्या च्यूइंगमप्रमाणे ही चपाती खेचली जाते. 

इतर सोप्या पद्धती

मैदा किंवा गव्हाच्या पीठात लोखंडाचा चुरासुद्धा मिसळला जातो. याची तपासणी करण्यासाठी काचेच्या प्लेटमध्ये काही प्रमाणात मैदा किंवा चपातीचं पीठ घ्या. त्या पीठावर लोहचुंबक फिरवा. जर पीठ चांगले असेल तर चुंबकावर काहीही चिकटणार नाही. पण पीठात भेसळ असेल तर त्यात लोखंडाचा चुरा चिकटलेला  दिसून येईल. 

तुम्ही वैज्ञानिक पद्धतीनेही पीठाची तपासणी करू शकतां. तुम्हाला मेडिकल स्टोअरमध्ये हाइड्रोक्लोरिक एसिड मिळेल. चपातीच्या पीठाची तपासणी करण्यासाठी एक टेस्ट ट्यूब घ्या आणि त्यात काही प्रमाणात पीठ एकत्र करा. त्यानंतर यात हायड्रोक्लोरिक एसिड घाला. हायड्रोक्लोरिक एसिड घातल्यानंतर जर काही असे पदार्थ दिसून आले जे गाळावे लागतील तर ते पीठ भेसळयुक्त असू शकतं. ....म्हणून बाथरूममध्ये सगळ्यात जास्त हार्ट अटॅक येतात; सर्वाधिक लोक करतात 'या' ३ चूका

एका काचेच्या ग्लासात पाणी घ्या त्यात एक चमचा पीठ घाला. जर पीठात भेसळ असेल तर त्यात असलेले भेसळयुक्त पदार्थ पाण्यावर तरंगू लागतील. असं झालं तर तुम्ही वापरत असलेले पीठ भेसळयुक्त असू  शकतं. चण्याचे पीठ चांगले आणि चमकदार दिसण्यासाठी त्यात अनेक रंग मिसळले जातात.  मेटानिल येलो हा रंग खाद्य पदार्थांना चमकदार रंग प्रदान करण्यासाठी त्यात मिसळला जातो. हे आरोग्यासाठी खूप नुकसानकारक ठरतं. यामुळे कँन्सर, पॅरालिसससारख्या आजारांचा धोका वाढतो. दुर्लक्ष नको! आता वेगळ्या क्रमाने दिसू लागली कोरोनाची लक्षणे, आधी येतो ताप मग सुरू होते अंगदुखी....

बनावट चण्याचे पीठ ओळखण्यासाठी, एक चमचे चण्याचे पीठ एका टेस्ट ट्यूबमध्ये घाला. नंतर तीन मिली अल्कोहोल घाला आणि मिश्रणाने मिसळा. नंतर हायड्रोक्लोरिक एसिडचे 10 थेंब घाला. जर मिश्रणाचा रंग गुलाबी झाला तर मग समजून घ्या की त्यात मेटानिल येलोची भेसळ झाली आहे.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यfoodअन्न