शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
3
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
4
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
5
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
6
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
7
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
8
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
9
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
10
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
11
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
12
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
13
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
14
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
15
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
16
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
17
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
18
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
19
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
20
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?

हार्ट निरोगी आणि फीट ठेवण्यासाठी काय खावे आणि काय नको?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2023 17:05 IST

Health Tips : अलिकडे कमी वयातच हृदयरोगांचा सामना करावा लागत आहे. आणि याला कारण लोकांची बदलती लाइफस्टाईल, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, दुर्लक्ष करणे इत्यादी सांगता येतील. 

Health Tips : अलिकडे हृदयरोगांचा धोका तरूणांनाही जास्त होत आहे. बदलती लाइफस्टाईल आणि चुकीच्या सवयींमुळे ही समस्या अधिक वाढत आहे. तरीही लोक याकडे दुर्लक्ष करतात आणि तब्येत बिघडवून घेतात. अशात तुम्हाला जर जास्त जगायचं असेल तर हृदय निरोगी ठेवण्याशिवाय पर्याय नाही. ते निरोगी ठेवण्यासाठी काही खास आहार घ्यावा लागेल.  देशातील हार्टसंबंधी रूग्णांची संख्या ६ कोटींपेक्षा अधिक आहे. इतकंच नाही तर ही संख्या हळूहळू वाढतच आहे. अशात खाण्या-पिण्याच्या सवयींबाबत जागरूकता ठेवणं गरजेचं आहे. 

हृदय निरोगी ठेवणं फार गरजेचं झालं आहे. पण अनेकांना हे माहीत नसतं की, हृदय निरोगी कसं ठेवावं. तर आज आम्ही तुम्हाला हृदय निरोगी ठेवण्यासाठी काही खास आणि सोपे उपाय सांगणार आहोत. या उपायांच्या माध्यमातून तुम्ही पूर्णपणे तुमचं हृदय निरोगी ठेवू शकाल.

काय खावं?

- आरोग्य आणि हृदय चांगलं ठेवण्यासाठी सर्वात फायदेशीर ठरतात ती वेगवेगळी फळं आणि वेगवेगळ्या हिरव्या भाज्या. तसेच ड्राय फ्रूट्स, नट्स आणि सीड्स जसे की, बदाम, अक्रोड, पिस्ता, शेंगदाणे, कलिंगड इत्यादींच्या बीया आरोग्यासाठी फायदेशीर असतात.

- दूध, दही, ताक यानेही आरोग्य चांगलं राहतं. तसेच ग्रीन, ब्लॅक टी चं सेवन करूनही शरीरातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी करू शकता. म्हणजेच याने हृदय निरोगी राहतं.

पाकिटातील पदार्थ ठेवा दूर

प्रोसेस्ड आणि प्रिजर्व्ड म्हणजे डब्यात बंद असलेले पदार्थ खाल्ल्याने आरोग्य खासकरून हृदयाला जास्त नुकसान होतं. 'रेडी टू इट' म्हणजे सेमी कुक्ड पदार्थ जसे की, भाज्या, बिर्याणी, पराठे, मिठाई इत्यादी तसेच पॅकेटमधील ज्यूस, सॉफ्ट ड्रिंक्स सुद्धा हृदयासाठी नुकसानकारक ठरतं.काय खाऊ नये?

- अनेकांना जेवणात वरून मीठ घेण्याची सवय असते. पण त्यांना हे माहीत नसतं की, त्यांची ही सवय त्यांच्यासाठी फार जास्त घातक आहे. तसेच वेगवेगळ्या फास्ट फूडमध्येही मिठाचं प्रमाण अधिक असतं. जास्त मिठामुळे हृदयाचं नुकसान होतं. त्यामुळे मीठ आणि साखरेचं सेवन कमीत कमी करा.

- जास्त कार्बोहायड्रेट्स असलेले पदार्थ कमी खावीत. फास्ट फूड आणि जंक फूड फार कमी खावेत. कारण मार्केटमधील हे पदार्थ फारच स्वस्त आणि खराब क्वालिटीच्या तेलात किंवा तूपात तयार केलेले असतात. याचा थेट प्रभाव हृदयावर पडतो. एकदा वापरलेलं तेल पुन्हा पुन्हा वापरलं जातं.

गोड काय खाऊ शकता?

पांढऱ्या साखरेऐवजी ब्राउन शुगरचा वापर करू शकता. तसेच नॉन-रिफाइंड गूळ सर्वात चांगला पर्याय आहे. बाजारात रिफाइंड गूळ जास्त मिळतो. पण हा गूळ आरोग्यासाठी नुकसानकारक आहे. नॉन-रिफाइंड गुळावर काळपटपणा आलेला असतो. पण आरोग्यासाठी हा गूळ सर्वात चांगला असतो. 

टॅग्स :Heart DiseaseहृदयरोगHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य