शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
3
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
4
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
5
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
6
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
7
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
8
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
9
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
10
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
11
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
12
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
13
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
14
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
15
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
16
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
17
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
18
लॅपटॉप जास्त वेळ मांडीवर अन् फोन खिशात ठेवाल तर वडील होण्याचे स्वप्न राहील अधुरे; नपुंसक होण्याचा धोका
19
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
20
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!

व्यायाम केल्यानंतर 'या' चूका करणे टाळा, होतील उलटे परिणाम; व्यायामाच्या फायद्याऐवजी होईल त्रास

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2021 15:57 IST

व्यायाम करून आल्यावर अनेक चुका करतात. ज्यामुळे आपण केलेल्या व्यायामाचा काहीही उपयोग होत नाही.

निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी सर्वात उत्तम मार्ग व्यायाम आहे. बरेचजण तंदुरुस्त राहण्यासाठी जिममध्ये जातात. मात्र, व्यायाम करून आल्यावर अनेक चुका करतात. ज्यामुळे आपण केलेल्या व्यायामाचा काहीही उपयोग होत नाही. अनेक वेळा आपण व्यायाम केल्यानंतर पुरेसे पाणी पित नाहीत. तसेच व्यायाम केल्यानंतर योग्य आहार घेणे देखील तितकेच महत्वाचे आहे.

हायड्रेटेड ठेवाबहुतेक लोक त्यांच्या दैनंदिन दिनक्रमात पुरेसे पाणी पीत नाहीत. शरीराला हायड्रेड होण्यापासून वाचवण्यासाठी पुरेसे पाणी प्यावे. या व्यतिरिक्त, द्रवपदार्थ वेळोवेळी आहारात घ्यावेत. जर तुम्ही जास्त व्यायाम करत असाल तर काही वेळानंतर तुम्ही पुरेसे पाणी प्यावे.

आराम कराव्यायाम केल्यानंतर नेहमी थोडा वेळ विश्रांती घ्या. जर तुम्हाला वर्कआउट करताना कोणत्याही प्रकारची समस्या येत असेल तर त्या वेळी थांबा. व्यायामादरम्यान, शरीराचे तापमान वाढते आणि रक्ताभिसरण देखील वेगाने होते. जे सामान्य होण्यास थोडा वेळ लागतो. याशिवाय, जर तुम्ही धावत असाल तर काही काळ चाला. तुमच्यासाठी किती धावणे योग्य आहे हे तुमच्यावर अवलंबून आहे.

गोड पदार्थव्यायामानंतर साखरयुक्त पदार्थांचे सेवन करू नये. आपण जास्त कॅलरी खाणे टाळावे. आपल्या सर्वांना माहित आहे की साखर असलेल्या गोष्टींमध्ये कॅलरीज जास्त असतात. व्यायाम केल्यानंतर तुम्ही दही खाऊ शकता. अन्नाच्या प्रमाणावर विशेष लक्ष द्या. वर्कआउटनंतर निरोगी गोष्टी खा. कॅलरीच्या संख्येवर विशेष लक्ष द्या.

जास्त प्रमाणात प्रथिनेजास्त चरबीयुक्त जेवण आणि स्नॅक्स खाल्ल्याने पाचन तंत्र मंद होते. शरीराला ऊर्जा देण्यासाठी आपण आहारात प्रथिने आणि जटिल कार्बोहायड्रेट्स समाविष्ट करू शकता.

शरीराकडे लक्ष द्याव्यायाम करताना आपण आपल्या शरीराकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. जर आपल्याला व्यायाम करताना खूप जास्त दम लागत असेल तर आपण थोडा वेळ व्यायाम करणे थांबवले पाहिजे.

वर्कआउटचे कपडेबराच वेळ वर्कआउट कपड्यांमध्ये राहिल्याने रॅशेस, इन्फेक्शन आणि शरीरातील पुरळ होऊ शकतात. वर्कआउटनंतर लगेच कपडे बदला किंवा तुम्ही शॉवर घेऊ शकता.

अशा प्रकारे पाचक प्रणाली चांगली होईलपाचक प्रणाली सुधारण्यासाठी उच्च फायबर आहार आवश्यक आहे. फायबरच्या मदतीने आपण जे अन्न खातो ते पचन योग्य प्रकारे होते. यासाठी फळे खा आणि हिरव्या भाज्या खा. याशिवाय ग्रीन टी प्या. सकाळी आणि संध्याकाळी कोमट पाणी प्या. जेवणाची वेळ ठरवा आणि बाहेरील अन्न खाणे पूर्णपणे टाळाच.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स