शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
2
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
3
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
4
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
5
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
6
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
7
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
8
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
9
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
10
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
11
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
12
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
13
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
14
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
15
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
16
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
17
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
18
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
19
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
20
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश

तुमच्या लघवीतूनही येतो का फेस? या गंभीर आजारांचा आहे हा संकेत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 16:07 IST

Foamy urine causes symptoms : यूरिनचा स्पीड जास्त असल्याने फेस तयार होतो. पण जर लघवीत फेस जास्तच दिसत असेल तर आणि दिवसेंदिवस वाढत असेल तर हा एखाद्या आजाराचा संकेत असू शकतो.

Foamy urine causes symptoms : लघवीचा रंग हलका किंवा गर्द पिवळा होता. असं तुमच्या डाएट किंवा एखाद्या आजारामुळे किंवा काही औषधांच्या सेवनामुळे होऊ शकतं. बऱ्याच लोकांच्या लघवीमध्ये अनेक फेस येतो. याची वेगवेगळी कारणे असू शकतात. जेव्हा लघवीत फेस दिसतो तेव्हा त्याला क्लाउडी यूरिन असं म्हटलं जातं.सामान्यपणे लघवीमध्ये फेस येणे ब्लॅडर भरण्याचा संकेत आहे. या स्थितीत यूरिन तुमच्या ब्लॅडरवर हल्ला करते. पण यामागे आणखीही काही कारणे असू शकतात. चला जाणून घेऊ लघवीतून फेस येण्याचं कारण काय आहे.

यूरिनचा स्पीड जास्त असल्याने फेस तयार होतो. पण जर लघवीत फेस जास्तच दिसत असेल तर आणि दिवसेंदिवस वाढत असेल तर हा एखाद्या आजाराचा संकेत असू शकतो. अशात तुमच्या लघवीत फेस दिसत असेल तर याच्या आणखीही काही लक्षणांवर लक्ष देण्याची गरज आहे. 

- हात, पाय, चेहरा आणि पोटावर सूज, हे किडनी डॅमेज झाल्याचे संकेत असू शकतात.

- थकवा

- भूक कमी लागणे

- मळमळ

- उलटी

- झोपेची समस्या

- लघवी कमी तयार होणे

- जर तुम्ही पुरूष असाल तर ऑर्गॅज्मवेळी सीमन फार कमी किंवा अजिबातच न येणे

- जर तुम्ही पुरूष असाल तर इंफर्टिलिटीची समस्या होणे

लघवीतून फेस येण्याची कारणं

जेव्हा तुम्ही बराच वेळ लघवी रोखून ठेवता आणि मग अचानक पास करता तेव्हा जास्त स्पीड असल्याने लघवीत फेस तयार होतो. पण हा फेस काही वेळातच क्लीअर होतो. अनेकदा लघवीत फेस तयार होण्याला यूरिनमध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त असण्याकडे इशारा करतं. यूरिनमधील प्रोटीन हवेच्या संपर्कात आल्यावर फेस तयार होतो.आणखीही काही कारणं

डिहायड्रेशन - जर कुणाला डिहायड्रेशनची समस्या झाली तर त्यांच्या लघवीचा रंग डार्क दिसतो. असं पाण्याचं सेवन फार कमी प्रमाणात केल्याने होतं. पाण्याचं सेवन कमी केल्याने  प्रोटीन यूरिनमध्ये डायल्यूट होत नाही. प्रोटीनमध्ये अनेक अशा प्रॉपर्टीज असतात ज्यांनी यूरिन पास करताना फेस तयार होतो. जर हायड्रेटेड राहिल्यानंतरही एखाद्या व्यक्तीच्या लघवीत फेस येत असेल तर हे किडनी डिजीजचं लक्षण असू शकतं.

किडनी डिजीज - किडनीचं मुख्य काम ब्लडमधील प्रोटीन फिल्टर करणं असतं. प्रोटीन आपल्या शरीरात फ्लूइडला बॅलन्स करण्यात महत्वाची भूमिका बजावतं. किडनी डॅमेज झाल्यावर किंवा किडनीसंबंधी काही आजार झाल्यावर हे प्रोटीन किडनीतून लीक होऊन यूरिनमध्ये मिक्स होतं. एल्बुमिन एकप्रकारचं प्रोटीन असतं जे आपल्या रक्तात असतं. जेव्हा तुमची किडनी योग्यप्रकारे काम करते तेव्हा किडनी या प्रोटीनला जास्त प्रमाणात तुमच्या लघवीत जाऊ देत नाही.  

डायबिटीस - शरीरात ब्लड शुगर लेव्हल वाढल्याने किडनीत एल्बुमिन हाय लेव्हलमध्ये पास होतं. ज्यामुळे यूरिनमध्ये फेस दिसतो. टाइप 2 डायबिटीसच्या रूग्णांमध्ये खालील लक्षणे दिसतात.

- धुसर दिसणे

- तोंड कोरडं पडणे

- सतत तहान लागणे

- सतत लघवी लागणे

- भूक लागणे

- त्वचेवर खाज येणे

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स