शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

आयुर्वेद डॉक्टरांनी सांगितलं कुणी खाऊ नये अळशीच्या बीया, जाऊ शकते डोळ्यांची दृष्टी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2024 11:28 IST

Flax Seeds Side Effects: जरी या बियांचे अनेक फायदे असले तरी काही लोकांसाठी या बीया घातक ठरू शकतात. जसे या बियांचे फायदे आहेत तसेच काही साइट इफेक्ट्सही आहेत.

Flax Seeds Side Effects:  वेगवेगळ्या बियांमध्ये वेगवेगळे पोषक तत्व असतात. याच कारणाने काही बियांचं सेवन करण्याचा सल्ला एक्सपर्ट देत असतात. यात अळशीच्या बियांचं सेवन करण्याचा सल्लाही अनेकदा दिला जातो. अळशीच्या बियांमध्ये प्रोटीन-कॅल्शिअमसारखे अनेक पोषक तत्व असतात. जरी या बियांचे अनेक फायदे असले तरी काही लोकांसाठी या बीया घातक ठरू शकतात. जसे या बियांचे फायदे आहेत तसेच काही साइट इफेक्ट्सही आहेत. या बियांच्या चुकीच्या वापरामुळे काही लोकांच्या डोळ्यांची दृष्टीही जाऊ शकते. 

आयुर्वेद डॉक्टर चैताली राठोड यांनी सांगितलं की, अळशीच्या बीया सगळ्यांसाठीच फायदेशीर नसतात. काही स्थितींमध्ये या बियांचं सेवन टाळलं पाहिजे. जर काही स्थितींमध्ये यांचं सेवन केलं तर अनेक गंभीर आजारांचा धोका होऊ शकतो. चला जाणून घेऊ या बियांच्या सेवनाने होणारे नुकसान...

अळशीच्या बीया खाण्याचे नुकसान

- अळशीच्या बीया गरम असतात.

- अळशीच्या बियांच्या सेवनाने स्पर्म काऊंट कमी होतो

- डोळ्यांची समस्या असेल तर या बियांचं सेवन करू नये

- अळशीच्या बियांनी पित्त दोष वाढतो

- पाइल्स, मासिक पाळी, नाकातून रक्त येत असेल तर या बीया खाऊ नये.

पित्त वाढतं

अळशीच्या बीया गरम असतात. त्यामुळे पित्त असंतुलित झाल्यावर यांचं सेवन करू नये. आयुर्वेद डॉक्टरांनुसार, या बियांमुळे पित्त वाढतं. तसेच याने कफही वाढतो. कफ आणि पित्त वाढल्याने पुरूषांमध्ये स्पर्म काऊंट आणि सीमनची क्वालिटी खराब होऊ शकते.

ब्लीडिंगमध्ये खाऊ नका

कोणत्या प्रकारची ब्लीडिंग होत असेल तर अळशीच्या बियांचं सेवन करू नये. डॉक्टरांनुसार, याने ब्लीडिंग वाढण्याची समस्या होते. 

डोळ्यांसाठी घातक

जर तुम्हाला डोळ्यांचा काही आजार किंवा आय डिसऑर्डर असेल तर यांचं सेवन करणं टाळलं पाहिजे. या बियांच्या सेवने डोळ्यांची दृष्टी कमी होऊ शकते आणि काही गंभीर केसेसमध्ये दिसणं बंद होऊ शकतं. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय या बियांचं सेवन करू नये.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य