शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

तज्ज्ञ म्हणे: कशाला घालता जिमचे हेलपाटे? त्याशिवायही वजन कमी करणे अतिशय सोपे! खास टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2022 17:07 IST

जे लोक काही कारणांमुळे जिममध्ये जाऊ शकत नाहीत. ते स्वतःला फिट कसे ठेवतील? आज तज्ज्ञांकडून जाणून घेऊया (Fitness Tips By Fitness Experts) की, घरच्याघरी आपल्याला फिट कसे राहता येईल.

सध्याच्या काळात बहुतेक लोकांची जीवनशैली बिघडली आहे आणि त्यांना स्वतःला तंदुरुस्त आणि निरोगी ठेवणे खूप कठीण झाले आहे. निरोगी राहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक जिममध्ये जातात आणि तेथे तासनतास कसरत करण्यात घालवतात. जिममध्ये जवळपास सर्व वयोगटातील लोक व्यायाम करताना दिसतात. मात्र जे लोक काही कारणांमुळे जिममध्ये जाऊ शकत नाहीत. ते स्वतःला फिट कसे ठेवतील? आज तज्ज्ञांकडून जाणून घेऊया (Fitness Tips By Fitness Experts) की, घरच्याघरी आपल्याला फिट कसे राहता येईल.

फिटनेस तज्ञ काय म्हणतात?आरोग्य आणि फिटनेस प्रशिक्षक अरुण सिंग यांच्या मते, निरोगी आणि फिट राहण्यासाठी जिममध्ये जाणे आवश्यक नाही. जर तुम्ही घरी किंवा उद्यानात शारीरिक हालचाली किंवा थोडा व्यायाम करत असाल तर तेही तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. निरोगी राहण्यासाठी शारीरिक हालचाली, संतुलित आहार, उत्तम जीवनशैली यासह काही गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे. तुम्ही योगा आणि ध्यानाद्वारेही फिटनेस सुधारता येऊ शकते.

या टिप्स फॉलो करा- फिट आणि निरोगी राहण्यासाठी चालणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही रोज सकाळी किंवा संध्याकाळी काही किलोमीटर चालत जाऊ शकता. अनेकांना धावणे देखील आवडते. धावणे आणि चालणे दोन्ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत.

- तुम्ही घर किंवा जवळच्या उद्यानात जाऊन थोडा वेळ योगा आणि ध्यान करू शकता. यामुळे तुमचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य दोन्ही सुधारेल.

- जर तुम्हाला नृत्याची आवड असेल तर हे तुमच्या आरोग्यासाठी एक प्लस पॉइंट देखील ठरू शकते. दररोज काही मिनिटे नृत्य केल्याने आपल्या शरीरावर सकारात्मक परिणाम होतो.

- निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी चांगला आहार घेणे सर्वात महत्त्वाचे आहे. प्रोटीन, व्हिटॅमिन्स, कार्बोहायड्रेट्स आणि इतर पोषक तत्वांनी समृद्ध असलेल्या गोष्टींचा आहारात समावेश करा. हंगामी फळे आणि भाज्या जरूर खा. मात्र कोणत्याही पदार्थाचे अति सेवन टाळावे.

- प्रत्येकाने आपली झोपण्याची आणि उठण्याची वेळ निश्चित करावी. रात्री उशिरापर्यंत जागणे आरोग्यासाठी चांगले नाही. दररोज 7 ते 8 तासांची झोप घेणे आपल्या आरोग्यासाठी फायद्याचे असते आणि कमीत कमी ताण घ्यावा.

 

टॅग्स :Healthआरोग्य