शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

कोणत्या समस्या असलेल्या लोकांनी करू नये उपवास? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2024 10:00 IST

Fasting Tips : काही आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांना डॉक्टर उपवास करण्यास मनाई करतात. कारण असे केल्यास त्यांचं आरोग्य आणखी धोक्यात येऊ शकतं.

Fasting Tips : श्रावणात अनेकजण सोमवार पाळतात आणि उपवास करतात. उपवास करण्याचे जसे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत तसे त्याचे काही नुकसानही आहेत. काही लोकांना उपवासामुळे समस्या होऊ शकतात. काही आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांना डॉक्टर उपवास करण्यास मनाई करतात. कारण असे केल्यास त्यांचं आरोग्य आणखी धोक्यात येऊ शकतं. अशाच काही लोकांबद्दल आपण माहिती घेऊया ज्यांनी उपवास अजिबात करू नये.

1) डायबिटीजच्या पेशन्ट्ससाठी वेळेवर जेवण करणे, औषध घेणे गरजेचं असतं. अशात त्यांनी जर उपवास करून शरीराची उपासमार केली तर त्यांना त्याचा मोठा फटका बसू शकतो.

2) हाय ब्लड प्रेशरच्या पेशन्टनी जर उपवास केला तर त्यांचं बॉडी सिस्टम बिघडू शकतं. उपवास केल्याने त्यांना अधिक त्रास होण्याची शक्यता अधिक असते.

3) नुकतीच ज्यांची सर्जरी झाली आहे त्यांनीही उपवास करू नये. सर्जरी झाल्यानंतर जखम सुकण्यासाठी बॉडीला आवश्यक व्हिटॅमिन आणि मिनरल्सची गरज असते.4) ज्या लोकांमध्ये रक्ताची कमतरता आहे त्यांनी उपवास करू नये. उपवास केल्यास अशांना शरीरात कमजोरी आणि थकवा अधिक जाणवू शकतो.

5) हार्टच्या पेशन्टना खाण्या-पिण्यावर जास्त लक्ष द्यावं लागतं. जर ते जास्त वेळ उपाशी राहिले तर त्यांच्या शरीराचं सिस्टम बिघडू शकतं.

6) ज्या लोकांना फुफ्फुसामध्ये काही त्रास असेल तर त्यांनीही उपवास करू नये. याने त्रास अधिक वाढू शकतो.

7) प्रेग्नेंट महिलांना सतत व्हिटामिन्स आणि मिनरल्सची गरज असते. जर या दरम्यान त्यांनी उपवास केला तर अशाने महिला आणि तिच्या बाळावर याचा वाईट परिणाम होऊ शकतो.

8) स्तनपान करणा-या महिलांनीही उपवास करू नये. यामुळे मुलांना आवश्यक ते व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स मिळत नाहीत. याचा मुलांच्या वाढीवर वाईट परिणाम होण्याची शक्यता अधिक असते.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य