शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

निरोगी आयुष्यासाठी एक तरी उपवास हवाच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2021 10:19 IST

काही जणांना उपवास करण्याची योग्य पद्धत माहीत नसल्याने त्यांना या उपवासाचा त्रास होतो. एका वेळेनंतर त्यांना हा उपवास नकोसा वाटतो.

- ओमकार गावंडमुंबई : निरोगी आयुष्य जगण्यासाठी उपवास करणे आवश्यक असल्याचे नेहमी आहार तज्ञ सांगतात. यासाठी भारतात अनेक जण विविध प्रकारे उपवास करतात. उपवास करण्याच्या पद्धती वेगळ्या असल्या तरी हे उपवास सर्वांना फलदायी ठरतात. बदललेला आहार आणि त्याच्या वेळा यामुळे अनेक आजार वाढतात. त्यामुळे अनेक जण आठवड्यातून एकतरी उपवास करतातच.मात्र काही जणांना उपवास करण्याची योग्य पद्धत माहीत नसल्याने त्यांना या उपवासाचा त्रास होतो. एका वेळेनंतर त्यांना हा उपवास नकोसा वाटतो. उपवासाच्यावेळी योग्य आहाराची काळजी घेणे देखील गरजेचे आहे. यासाठी आहार तज्ञाचा योग्य सल्ला घेऊन उपवास केल्यास त्याचा नक्कीच फायदा होतो.एकादशी दुप्पट खाशी, असे नको !उद्या उपवास धरायचा आहे, म्हणून आदल्या दिवशी जास्त खाणे किंवा उशिरा खाणे योग्य नाही. यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्याचप्रमाणे उपवासाच्या दिवशी चहा, दूध, बटाट्याचे तळलेले पदार्थ यांचे जास्त सेवन करू नये. यामुळे पोटाचे विकार वाढू शकतात. तसेच रात्री उपवास सोडताना देखील समतोल आहार घेणे गरजेचे आहे. तरच उपवास सफल होऊ शकतो.उपवासाला काय खावे?शरीरात पाण्याचे प्रमाण योग्य राहण्यासाठी मुबलक प्रमाणात पाणी प्यावे. दर दोन ते तीन तासांनी फळे खावीत. उपवासाला चालणारी भाजी व दही हलक्या प्रमाणात खावे. दिवसभर उत्साह टिकून राहावा यासाठी लिंबू पाणी व ताक यांचे सेवन करत रहावे.काय खाऊ नयेउपवासाला चालते म्हणून खिचडी, तळलेले साबुदाणा वडे, शेंगदाणे, चहा यांचे सेवन जास्त प्रमाणात करू नये. बाहेरून आणलेले तळलेले वेफर्स, चिवडा तसेच उपवासाचे इतर पदार्थ खाणे टाळावे.निरोगी आयुष्यासाठी व्यायाम, चांगला आहार या गोष्टींसोबतच उपवास देखील महत्त्वाचा आहे. उपवासाच्या दिवशी शक्यतो पाणी व फळांचा रस यावरच भर दिला पाहिजे. हल्ली उपवासाच्या नावे लोक इतर दिवसांपेक्षा जास्त तेलकट व गोड पदार्थ खातात. ते टाळायला हवे.- डॉ. समीर नाईक, आहारतज्ञ मीही करतो आठवड्यातून एक उपवासउपवासामुळे शरीराला एक प्रकारचा आरामच दिला जातो. त्यामुळे मी आठवड्यातून एक उपवास धरतो. यामुळे आजारांपासून दूर राहण्यास देखील मदत होते. - शैलेश पाटीलअनेकदा लोकांना जिम ट्रेनर कडून अत्यंत कठोर डाएट सांगितला जातो. यामुळे सुरुवातीचे काही महिने तो डाएट व्यवस्थितरीत्या पाळला जातो. यानंतर कंटाळून तो डायरेक्ट सोडला जातो. त्यापेक्षा आठवड्यातून एकदा उपवास केल्यास त्यात सातत्य राहते.- विनिता केणी