वजन वाढण्याची खुप कारणं असतात. त्यापैकी व्यायामाचा अभाव व अनहेल्दी खाण्याच्या सवयी या जास्त जबाबदार असतात. मात्र, वजन वाढवण्यासाठी बदलत्या जीवनशैलीप्रमाणे आयुष्यामध्ये ताणतणाव वाढल्यामुळे देखील वजन वेगाने वाढते. ताण घेतल्यामुळे वजन कसे वाढते हे जाणून घेऊयात.
भूक न लागणे किंवा भूक वाढणे तणावामुळे आपली भूक कमी होऊ शकते किंवा अधिक होऊ शकते. यामुळे आपण अनियमित जास्त खातो आणि यामुळेच आपले वजन झटपट वाढण्यास सुरूवात होते.
काय उपाय करालयोग्य आहार घ्या वजन कमी करण्याचा अर्थ उपाशी राहणे नव्हे तर आपल्या आहारात पौष्टिक घटकांचा समावेश करणे होय. अन्नावर प्रक्रिया केलेल्या गोष्टीऐवजी आरोग्यदायी गोष्टी खा. यामुळे आपले पोट बराच काळ भरल्यासारखे वाटते आणि यामुळे आपल्याला भूक देखील लागत नाही.
जास्तीतजास्त पाणी प्यापाणी हा उर्जेचा मुख्य स्रोत आहे. पाण्यामुळे तुमचे पचन कार्य व्यवस्थित होते. तसेच तुमची रोग प्रतिकारशक्ती वाढते. याशिवाय हे वजन कमी करण्यास देखील मदत करते. पाण्यामुळे तुमची भूकही कमी होते.