शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
2
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
3
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
4
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
5
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
6
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
7
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
8
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
9
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
10
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
11
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
12
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
13
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
14
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
15
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
16
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
17
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
18
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
19
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
20
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी

घराबाहेर पडताय? तापमानाचा पारा वाढतोय, पाणी सोबत ठेवा अन् खबरदारी घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 16:08 IST

Health Tips : योग्य प्रमाणात पाणी पिल्यास उन्हाळ्यातील तक्रारींवर मात करता येते. दररोज किमान तीन लिटर पाणी प्यायला हवे.

फेब्रुवारीच्या उत्तरार्धापासून थंडी कमी झाली असून, आता उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. कमाल आणि किमान तापमानात वाढ झाल्याने दुपारच्या वेळी उकाडा जाणवत आहे. अशा परिस्थितीत शरीराचे निर्जलीकरण अर्थात डिहायड्रेशनचा धोका संभावतो. पातळी कमी झाल्याने शरीरावर गंभीर परिणाम होतो. योग्य प्रमाणात पाणी पिल्यास उन्हाळ्यातील तक्रारींवर मात करता येते. दररोज किमान तीन लिटर पाणी प्यायला हवे. फळांचा सर, लिंबूपाणी, नारळ पाण्याचे सेवन लाभदायी असते. तसेच घराबाहेर पडताना न विसरता पाण्याची बाटली सोबत ठेवावी.

पहाटे थंडी, दुपारी ऊनथंडी संपून उन्हाळा सुरू झाल्याने दुपारच्या वेळी उकाडा जाणवत आहे. असे असले तरी पहाटेच्या वेळी वातावरणात गारवा पसरत आहे.

यंदा पारा ५ अंशांपर्यंतयंदाच्या हिवाळ्यात जिल्ह्याचा किमान तापमानाचा पारा ५ अंशांपर्यंत घसरला होता. निफाडचे तापमान त्याहूनही खाली आले होते. मात्र, ते जास्त काळ टिकू शकले नाही. वातावरणातील बदलामुळे हिवाळाभर तापमानात चढ-उतार सुरू होती.

तापमान ३४ अंशांवरहिवाळ्यात ५ अंशांपर्यंत घसरलेल्या तापमानात फेब्रुवारी अखेरला ३४ अंशांपर्यंत वाढ झाली. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच तापमानात वाढ झाल्याने मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात उष्णतेचा सामना करावा लागू शकतो.

काय काळजी घ्याल?उन्हाळ्यातील उष्णतेपासून बचावासाठी सुती व फिकट रंगाच्या कपड्याचा वापर करावा. योग्य प्रमाणात पाणी पिणे हाच रामबाण उपाय आहे. सकाळी १० ते दुपारी ३ पर्यंत सूर्याच्या किरणांची प्रखरता सर्वाधिक असते. त्यामुळे या वेळात घराबाहेर पडणे टाळावे.

पाणी वारंवार प्याशरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवण्यासाठी ठरावीक वेळेने थोडे पाणी प्यावे. त्याचबरोबर नारळाचे पाणी, सरबत, पन्हे, ताक, दूध, फळांचा रस घ्या. पुन्हा पुन्हा पाणी पिऊनही तहान भागत नसल्यास कलिंगडाचा रस, सब्जाचे पाणी घ्यावे. चहा, कॉफी, कोला, बीअर, मद्य, आदी उष्णता वाढविणाऱ्या पेयांपासून दूर राहावे.

उन्हाळ्यात शरीरातील पाणी कमी पडणे नुकसानदायक ठरते. पाणी कमी पडल्यास डिहायड्रेशन, थकवा, अशक्तपणा जाणवणे, आदींसह रक्तदाबाची समस्या, त्वचा कोरडी होणे, डोळे निस्तेज होणे अशा समस्या जाणवतात. त्यासाठी ठरावीक वेळेने थोडे पाणी प्यायला हवे.- डॉ. तुषार कुटे, फॅमिली फिजिशियन

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHeat Strokeउष्माघात