शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्यात बिनधास्त व्यायाम करा पण व्यायामाचे हे 11 नियम काटेकोरपणे पाळा!

By admin | Updated: May 9, 2017 17:59 IST

खरंतर उन्हाळ्यातही रोजचा व्यायाम कूल होवू शकतो त्यासाठी काही नियम पाळून व्यायाम करावा लागतो इतकंच !

 

- मृण्मयी पगारे

उन्हाळ्यात सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सतत गरम होत असतं. घाम येत असतो. हा हू करत आपण आपली रोजची काम करत राहतो. पण उन्हाळ्यात व्यायामाचं काय? मुळातच व्यायामामुळे घाम येतो, शरीराचं तापमान वाढतं. थकवा येतो. अनेक जण केवळ उन्हाळ्यामुळे व्यायामाला ब्रेक देतात. तर काही जण मात्र व्यायाम करतच राहतात. पण बऱ्याचजणांना उन्हाळ्यात व्यायाम केल्यानं थकवा येणं, हाता पायात गोळे येणं, डिहायडे्रशन होणं यासारखे त्रास होतात. खरंतर उन्हाळ्यातही रोजचा व्यायाम कूल होवू शकतो त्यासाठी काही नियम पाळून व्यायाम करावा लागतो इतकंच !

 

               

उन्हाळ्यात व्यायाम करताना

1.  उन्हाळ्यात दिवसातला गरम वेळ टाळून व्यायाम करावा. शक्यतो सकाळी 10 ते दुपारी 4 याकाळात घरात-बाहेर व्यायाम करणं टाळावं. सकाळी लवकर शक्यतो सूर्य उगवण्याच्या आधीच व्यायामाला जावं. उन्हाळ्याच्या दिवसात शक्यतो छताखाली व्यायाम करावा. बाहेर व्यायामाला जात असू तर पिण्याच्य्या पाण्यासोबत सोबत स्प्रे बाटलीही सोबत घ्यावी. व्यायाम करताना मधून मधून स्प्रे चेहेऱ्यावर, हातावर, पायावर मारावा. यामुळे त्वचेला आराम मिळतो. आणि व्यायाम करायला उत्साह येतो.

2. व्यायामाच्या वेळेस गडद रंगाचे आणि जाडजूड आणि घट्ट कपडे वापरू नये. गडद रंग उष्णता शोषून घेतं. आणि जाडजूड कपड्यांमुळे कपड्यातली उष्ण्ता शरीरात शोषली जाते. त्यामुळे व्यायामादरम्यान अस्वस्थ वाटतं.

3. व्यायामाच्या दरम्यान थोडं थोडं पाणी पित राहावं. अनेकजण एक तास किंवा त्यापेक्षा जास्त व्यायाम करतात त्यांनी व्यायाम करताना दर दहा पंधरा मीनिटानंतर दोन चार घोट पाणी प्यावं. यामुळे व्यायामादरम्यान शरीरातील आर्द्रता टिकून राहते. व्यायामाआधी खूप पाणी पिण्याची गरज नाही. पण व्यायामादरम्यान थोडं थोडं पाणी पिण्याला महत्त्व आहे. तसेच जास्त वेळ व्यायाम करताना मधून मधून फळाचा एखादा तुकडा खाणं, गाजर खाणं फायदेशीर ठरतं.

 

                          

4. उन्हाळ्यात नियमित व्यायाम करणाऱ्यांनी आपल्या शरीरात पुरेशी आर्द्रता आहे ना हे तपासत राहावं. हे तपासण्याचा सोपा मार्ग म्हणजे आपली लघवी. आपल्या लघवीचा रंग जर फिकट पिवळा असेल तर आपण योग्य प्रमाणात पाणी पित आहोत हे समजावं. आणि जर लघवीचा रंग गडद पिवळा असेल तर आपल्याला पाणी जास्त पिण्याची गरज आहे हे समजावं.

5. उन्हाळा आहे, व्यायाम करायचा आहे म्हणून खूप पाणी पिऊ नये. अति पाणी पिण्यामुळे रक्तातील सोडियमची पातळी खालावते. त्यामुळे व्यायामाच्या आधी पाणी न पिता व्यायामादरम्यान थोडं आणि व्यायाम संपल्यानंतर थोडं जास्त पाणी प्यावं. आणि दिवसातल्या इतर वेळी जेव्हा तहान लागेल तेव्हाच पाणी प्यावं.

6. अनेकजण व्यायाम करताना शीतपेयं पितात जे एकदम चुकीचं आहे. व्यायामाच्या वेळेस सरबतासारखं ऊर्जा देणारं काहीतरी प्यावसं वाटत असेल तर मग स्पोर्टस ड्रिंक प्यावं. या स्पोर्टस ड्रिंकमध्ये आवश्यक त्या कॅलरीज असतात ज्या व्यायामाच्यावेळेस उपयोगी पडू शकतात्.

7. उन्हाळ्यात व्यायाम करताना आणखी कूल फीलिंग हवं असेल तर व्यायामाआधी थंड पाण्यानं आंघोळ करावी.

8. व्यायाम करताना त्या दिवसाचं तापमान कसं आहे हे आधी फील करावं. खूपच उष्णता वाटत असेल तर मग व्यायामाचा फॉर्म्युला  बदलावा. उष्ण दिवशी जास्त श्रम पडणार, दम लागणार नाही असा व्यायाम करावा.

 

                        

9. तासभर व्यायाम करणार असाल तर मग व्यायामादरम्यान ब्रेक घ्यावा. यामुळेही उन्हाळ्यात जास्त दमायला होत नाही.

10. व्यायाम करताना नेहेमीसारखा उत्साह वाटत नसेल, अती थकवा आल्यासारखं वाटत असेल, अशक्तपणा आला असेल, डोकं दुखत असेल किंवा पायात गोळे किंवा चमका येत असेल , हदयाचे ठोके खूपच जास्त वाढलेले असतील तर मग व्यायाम तिथल्या तिथेच थांबवा आणि घरी येवून थोडा वेळ आराम करा.

11. एखाद्या आजारावर औषध उपचार चालू असतील तर उन्हाळ्यात व्यायाम करताना कधी कोणता आणि कसा व्यायाम करावा याबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.