शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कामाच्या मधे घेत रहा छोटे छोटे ब्रेक, दुर्लक्ष केल्यास गंभीर आजारांचा धोका - रिसर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2024 11:42 IST

Sitting Side Effects : रिसर्चमधून सांगण्यात आलं आहे की, रोज ८.५ तास आणि आठवड्यातून ६० तास, ऑफिस, घरी किंवा प्रवासादरम्यान तुम्ही सतत बसत असाल तर वेळेआधी तुम्ही म्हातारे होऊ शकता.

Sitting Side Effects : वेळेआधीच म्हातारे होण्याची कारणे आणि त्यांबाबतचे वेगवेगळे रिसर्च नेहमीच समोर येत असतात. ज्यात सांगण्यात येतं की, लोकांची लाइफस्टाईल किती चुकीची आहे आणि त्यांनी निरोगी जीवन जगण्यासाठी काय करावं. एका नुकत्याच करण्यात आलेल्या रिसर्चमधून सांगण्यात आलं आहे की, रोज ८.५ तास आणि आठवड्यातून ६० तास, ऑफिस, घरी किंवा प्रवासादरम्यान तुम्ही सतत बसत असाल तर वेळेआधी तुम्ही म्हातारे होऊ शकता आणि सोबतच तुम्हाला अनेक आजारांचा धोकाही राहतो.

या रिसर्चमधून एक महत्वाची बाब समोर आली की, कमी वयात किंवा २० मिनिटे पायी चालणे अशा मध्यम रूटीनने तुम्ही याचा प्रभाव कमी करू शकता. तसेच जर तुम्ही रोज ३० मिनिटे धावणे किंवा सायकल चालवणे अशा अॅक्टिविटी करूनही मदत मिळवू शकता. 

अमेरिकेतील यूनिव्हर्सिटी ऑफ कोलोराडे बोल्डरमधील प्रोफेसर चंद्रा रेनॉल्ड्स यांनी सांगितलं की, "दिवसभर कमी बसणं, जास्त व्यायाम करणं या दोन्ही गोष्टींच्या मदतीने तुम्ही कमी वयातच म्हातारे होण्याचा धोका कमी करू शकता".

अभ्यासकांच्या टीमने ३३ वयोगटाच्या १ पेक्षा अधिक लोकांवर हा रिसर्च केला. तसेच यात ७३० जुळ्या मुलांचाही समावेश करण्यात आला. जेणेकरून हे जाणून घेता यावं की, जास्त वेळ बसल्याने तरूण आणि वयस्कांच्या कोलेस्ट्रॉलवर आणि बॉडी मास इंडेक्सवर काय प्रभाव पडतो.

यात सहभागी लोकांचा रोजचा ९ तास बसण्याचा रेकॉर्ड नोंदवण्यात आला, तर ८० ते १६० मिनिटे त्यांनी मध्यम शारीरिक अॅक्टिविटी केली. यातून समोर आलं की, जर कुणी जास्त वेळ बसून राहत असेल, ते तेवढे जास्त लवकर म्हातारे होतात.

रेनॉल्ड्स म्हणाले की, "कामानंतर थोडा वेळ चालणं पुरेसं नाही. रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की, जे लोक रोज ३० मिनिटे धावतात किंवा सायकल चालवतात त्यांचं कोलेस्ट्रॉल आणि बीएमआय प्रमाण ५ ते १० वर्षाच्या छोट्या व्यक्तींसारखं दिसतं. अभ्यासक म्हणाले की, कामाच्या मधे छोटे छोटे ब्रेक घेणं यात फायदेशीर ठरू शकतं".

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य