शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

तुम्हाला आकडी येते का? एपिलेप्सी आजार असू शकतो; मेंदूविकार तज्ज्ञांकडून तपासणी गरजेची

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2023 11:28 IST

या आजाराबाबत फारशी माहिती आणि जनजागृती नसल्याने अनेक रुग्णांना या आजाराचे निदान मिळत नसल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. 

मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून आपल्याकडे रुग्णांना आकडी येते, काही काळात रुग्ण बरा होतो. मात्र त्या रुग्णांचे आपल्याकडे व्यवस्थित निदान केले जात नाही. त्यामुळे त्यांना वर्षातून काही वेळा आकडी येत असते, मात्र अशा रुग्णांची मेंदूविकार तज्ज्ञांकडून तपासणी करण्याचे गरजचे असते. कारण या अशा रुग्णांना एपिलेप्सी नावाचा आजार असू शकतो. या आजाराचे प्रमाण राज्यातील लोकसंख्येच्या एक टक्का असल्याचे सांगण्यात येते. या आजाराबाबत फारशी माहिती आणि जनजागृती नसल्याने अनेक रुग्णांना या आजाराचे निदान मिळत नसल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. 

अचानक येतो झटकाएपिलेप्सी आजारात फिट येणे किंवा आकडी किंवा मिरगी अशी लक्षणे आढळून येतात त्याला अपस्मार नावाने संबोधतात. या आजारामध्ये रुग्णाला कोणतीही पूर्वकल्पना न येता झटका येतो. अनेकवेळा त्या रुग्णाची शुद्ध हरपते, दातखिळी बसते. त्यावेळी रुग्ण त्या ठिकाणी खाली जमिनीवर कोसळतो. त्यावेळी आजूबाजूच्या लोकांना काय करावे, हे पटकन उमजत नाही. यामध्ये काही काळानंतर रुग्ण पुन्हा स्वतःहून स्थिर स्थावर होतो. मात्र जेव्हा हा झटका येतो त्यावेळी त्याला काहीही कळत नाही. 

औधषोपचारासह शस्त्रक्रियेचा पर्यायशहरात या आजारावर उपाय केले जातात.  विशेष म्हणजे हा आजार लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत कोणत्याही वयोगटात होऊ शकतो. या आजारावर उपाय करण्यासाठी मेंदूविकार तज्ज्ञांची गरज असते. त्यामध्ये हे तज्ज्ञ ई ई जी  (इलेक्ट्रोएन्सेफॅलोग्राम) चाचणी, एम आर आय तसेच कुटुंबातील कोणत्या सदस्याला हा आजार आहे का ? हे पाहून या आजाराचे निदान करत असतात. निदान केल्यानंतर हा आजार बरा करण्यासाठी रुग्णाला ४-५ वर्षे औषधे घ्यावी लागतात. औषधाने हा आजार बरा झाला नाहीतर शस्त्रक्रिया केली जाते. 

काय असतात कारणे  काही प्रमाणात हा आजार आनुवंशिक असतो  मेंदूमध्ये गाठ येणे   मेंदूला इजा होणे   मेंदूला संसर्ग होणे  जन्मावेळी श्वास मेंदूला न मिळणे 

हे करू नये ?   या अशा पद्धतीचे रुग्ण पाहिल्यावर अनेकवेळा चप्पल आणि कांदा तोंड नाकावर लावला जातो.  तोंडावर सोडा किंवा पाणी मारले जाते   तोंडात चमचा किंवा तत्सम धातुयुक्त पदार्थ घुसविला जातो. 

ग्रामीण भागात  अनेक रुग्णांना या आजाराची माहिती नाही. या आजाराचे निदान करणे सोपे आहे आणि त्यावर नियंत्रण ठेवणेसुद्धा सोपे आहे. या आजारात त्या व्यक्तीला कुठेही फिट्स येऊ शकते. त्यामुळे या आजाराचे एकदा निदान झाल्यानंतर अशा रुग्णांनी ड्रायव्हिंग, स्वामिंग करणे टाळणे गरजेचे आहे. - डॉ. निर्मल सूर्या, अध्यक्ष, इंडियन फाउंडेशन ऑफ न्यूरोरिहॅबिलिटेशन

टॅग्स :Healthआरोग्य