शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
5
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
6
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
7
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
8
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
9
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
10
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
11
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
12
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
13
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
14
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
15
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
16
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
17
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
18
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम
19
आता एका क्लिकवर मिळेल उमेदवारांची संपत्ती आणि गुन्हेगारी रेकॉर्ड; 'हे' ४ ॲप्स लॉन्च!
20
या वर्षीच्या वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा, अमेरिकेच्या 2 तर जपानच्या एका संशोधकाचा संयुक्त सन्मान

एनर्जी ड्रिंक्स की एनर्जी ‘डाऊन’

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 06:37 IST

जकाल अनेक तरुण आणि किशोरवयीन मुले खेळताना किंवा सहजच मोठ्या प्रमाणावर ऊर्जादायक पेये (एनर्जी ड्रिंक) घेताना दिसतात.

डॉ. अविनाश सुपे पोटविकारतज्ज्ञ

जकाल अनेक तरुण आणि किशोरवयीन मुले खेळताना किंवा सहजच मोठ्या प्रमाणावर ऊर्जादायक पेये (एनर्जी ड्रिंक) घेताना दिसतात. या सवयीमागे आकर्षक जाहिराती, रंगीबेरंगी पॅकेजिंग आणि सोशल मीडियावरील प्रमोशन हे मुख्य कारणीभूत आहेत. काही वेळा, स्पर्धात्मक खेळांच्या अंतिम टप्प्यात ही पेये तात्पुरती ऊर्जा देऊ शकतात; परंतु वारंवार किंवा नियमित सेवन आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम करू शकते. निद्रानाश, चिंता यासारख्या सौम्य त्रासांपासून ते हृदयरोग, टाइप २ मधुमेह आणि अगदी मृत्यूपर्यंतच्या समस्या या पेयांमुळे उद्भवू शकतात.

ऊर्जादायक पेय म्हणजे काय?

ऊर्जादायक पेयांमध्ये मोठ्या प्रमाणावर कॅफीन, साखर आणि इतर उत्तेजक घटक असतात. या पेयांमधील साखरेचे प्रमाण सर्वसाधारण शीतपेयांच्या दुप्पट किंवा त्याहून अधिक असते. हे पेय तात्पुरती ऊर्जा आणि जागरूकता वाढवतात, पण त्याचे दीर्घकालीन परिणाम घातक असू शकतात.

आरोग्यावर होणारे दुष्परिणाम

हृदयाचे आजार : या पेयांमुळे हृदयाचे ठोके वेगाने वाढतात, रक्तदाब वाढतो, छातीत धडधड किंवा अनियमित ठोके जाणवू शकतात. काही वेळा छातीत दुखणे किंवा अतिसंवेदनशील व्यक्तींमध्ये हृदय बंद पडण्याचा धोका असतो.

झोपेचे विकार : कॅफीनमुळे झोप न लागणे, बेचैनी आणि सतत थकवा जाणवू शकतो. झोपेची कमतरता शारीरिक व मानसिक आरोग्यावर परिणाम करते.

मानसिक आरोग्य : या ड्रिंक्समुळे चिंता, चिडचिड, नैराश्य आणि काही वेळा आत्महत्येचे विचारही येऊ शकतात. Attention-deficit/hyperactivity disorder किंवा पॅनिक अटॅकची जोखीम वाढते.

पचनाच्या समस्या : मळमळ, उलटी, पोटदुखी, अतिसार, डोकेदुखी अशी लक्षणे दिसू शकतात.

साखरेचे दुष्परिणाम : जास्त साखरेमुळे लठ्ठपणा, मधुमेह, दातांची झीज, त्वचेचे आजार वाढू शकतात. कमी pH आणि जास्त साखर दात किडण्यास कारणीभूत ठरू शकते.

वजन वाढ आणि टाइप २ मधुमेह : जास्त साखर असल्याने वजन वाढते आणि टाइप २ मधुमेहाचा धोका वाढतो.

व्यसनांची शक्यता : संशोधनानुसार, ऊर्जादायक पेये घेणाऱ्या मुलांमध्ये धूम्रपान, मद्यपान किंवा इतर व्यसनांची शक्यता जास्त असते. हे पेय थांबवल्यास डोकेदुखी, चिडचिड अशी लक्षणे दिसू शकतात.

कोणाला जास्त धोका आहे?

मुले आणि किशोरवयीन मुले : त्यांची शारीरिक वाढ आणि विकास सुरू असल्यामुळे ते या पेयांच्या दुष्परिणामांना अधिक संवेदनशील असतात.

अंतर्निहित आरोग्य समस्या असलेले : पूर्वीपासून हृदयरोग, चिंता विकार किंवा इतर आजार असलेल्या व्यक्तींना जास्त धोका असतो.

अल्कोहोलमध्ये एनर्जी ड्रिंक्स मिसळणारे : अल्कोहोल आणि एनर्जी ड्रिंक्स एकत्र घेतल्याने दोन्हींचे दुष्परिणाम वाढतात.

पालकांसाठी सूचना

१२-१८ वयोगटातील मुलांनी दररोज १०० मिग्रॅपेक्षा जास्त कॅफीन घेऊ नये. ऊर्जादायक पेये पूर्णपणे टाळावीत.

ऊर्जा वाढवण्यासाठी हायड्रेशन, पुरेशी झोप आणि नियमित व्यायाम हे आरोग्यदायी पर्याय निवडावेत.

लिंबूपाणी, ताक, नारळपाणी यासारखी नैसर्गिक पेये द्यावीत.

मुलांशी संवाद साधून या पेयांचे दुष्परिणाम समजावून सांगावेत.

थोडक्यात : ऊर्जादायक पेयांचे आकर्षण तात्पुरते असले तरी त्याचे आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. तरुणांनी, त्यांच्या पालकांनी सजग राहून या पेयांचे सेवन टाळणे हेच आरोग्यासाठी हितावह आहे. निरोगी प्रौढांसाठी अधूनमधून, मर्यादित प्रमाणात सेवन केल्यास मोठा धोका नसला तरी जास्त किंवा नियमित सेवन आरोग्यास घातक ठरू शकते.