मुंबई : आरोग्याविषयी वाढती जागरूकता आणि मधुमेहासारख्या आजारांचे वाढते प्रमाण पाहता अनेकजण साखरेऐवजी गूळ वापरण्याकडे वळताना दिसतात.
‘नैसर्गिक’ पर्याय म्हणून गुळाची लोकप्रियता वाढली असली तरी तो खरोखरच साखरेपेक्षा सुरक्षित आहे का?, याबाबत तज्ज्ञांमध्ये मिश्र मतं आहेत. आहारतज्ज्ञ आणि मधुमेहतज्ज्ञांच्या मते, गुळाचे काही फायदे मान्य असले तरी त्याचा अतिरेक साखरेइतकाच धोकादायक ठरू शकतो.
साखर आणि गुळातील फरक काय?
साखर पूर्णपणे प्रक्रिया केलेली सुक्रोज; तर गूळ कमी प्रक्रिया केलेला, खनिजे शिल्लक असणारा गोड पदार्थ.
रासायनिक रचना
दोघांची मूलभूत रचना सुक्रोजवर आधारितच; गुळात थोड्या प्रमाणात खनिजे-कॅल्शियम, पोटॅशियम, लोह.
रक्तातील साखरेवरील परिणाम
साखरेचा GI जास्त; गुळाचा थोडा कमी, पण दोन्ही रक्तातील साखर झपाट्याने वाढवतात.
गूळ खाण्याचे फायदे
पचन सुधारते, उष्णता देते, थोडे खनिज मिळतात, सर्दी-खोकल्यात आराम देण्याची लोकमान्यता.
गुळातून खरेच पुरेसे लोह मिळते का?
तज्ज्ञांच्या मते, गुळातील लोहाचे प्रमाण अतिशय मर्यादित असून, त्यावर उपचारात्मक स्रोत म्हणून अवलंबून राहणे चुकीचे आहे.
साखरेइतकाच गुळाचा वापर धोकादायक आहे का?
होय. गुळातील कॅलरीज साखरेइतक्याच; अति सेवनामुळे वजन वाढ, फॅटी लिव्हर आणि रक्तातील साखर वाढण्याचा धोका समान.
गूळ उपयोगी आहे, पण तो ‘आरोग्यदायी साखर’ नाही. खनिजे मिळतात, पण प्रमाण अत्यल्प. मधुमेह असलेल्या रुग्णांनी किंवा वजन वाढलेल्यांनी साखर किंवा गूळ दोन्ही टाळावे. दोन्हींचा ग्लायसेमिक प्रभाव सारखाच धोक्याचा आहे. केवळ इन्स्टंट एनर्जीसाठी थंड पेये घेतो, त्याऐवजी थोडा गूळ आणि पाणी घेणे चांगले, पण गूळ हा साखरेला पर्याय नाही.
डॉ. संध्या कदम, एमडी, आयुर्वेद
Web Summary : While jaggery offers some benefits and minerals, experts warn that excessive consumption poses similar risks to sugar. Both rapidly increase blood sugar levels, potentially leading to weight gain and other health issues, especially for diabetics.
Web Summary : गुड़ के कुछ फायदे और खनिज हैं, लेकिन विशेषज्ञ चेतावनी देते हैं कि अत्यधिक सेवन चीनी के समान जोखिम पैदा करता है। दोनों तेजी से रक्त शर्करा के स्तर को बढ़ाते हैं, जिससे वजन बढ़ना और अन्य स्वास्थ्य समस्याएं हो सकती हैं, खासकर मधुमेह रोगियों के लिए।