शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

शिळे झाल्यानंतर चुकूनही करू नका 'या' पदार्थांचे सेवन; उरलेलं अन्न खाणं ठरू शकतं घातक

By manali.bagul | Updated: January 31, 2021 09:45 IST

Health Tips in Marathi :

सध्याच्या व्यस्त जीवनशैलीत रात्रीचं उरलेलं दुपारी किंवा दुपारचं उरलेलं रात्री खाण्याची अनेकांना सवय असते.  काही पदार्थ शिळे खाणं शरीरासाठी घातक ठरू शकतं. कारण त्यामुळे आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. आज आम्ही तुम्हाला कोणत्या पदार्थांचे सेवन टाळायला हवं याबाबत अधिक माहिती देणार आहोत. नेहमी निरोगी आणि फिट राहण्यासाठी काही पदार्थांचे सेवन टाळणं शरीरासाठी  उत्तम ठरतं.

बटाटा

शिळ्या बटाट्याचे  सेवन कधीही करू नये. कारण बटाटा शिजवल्यानंतर दीर्घकाळ तसाच ठेवल्यास त्यात क्लोस्ट्रीडियम बोटुलिनम नावाचे बॅक्टेरियांची वाढ होते. त्यामुळे बोटुलिज्म आजाराचा सामना करावा लागू शकतो. या आजाराची लागण झाल्यास डोळ्यांना कमी दिसणं, श्वास घ्यायला त्रास होणं या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. 

पालक

पालक आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात, परंतु पालक जेव्हा ते शिळं असते तेव्हा ते खाऊ नये. शिळे पालक घेतल्यामुळे आपल्याला बर्‍याच समस्यांना सामोरे जावे लागू शकते. पालक जास्त प्रमाणात शिजवूनही खाऊ नये.

भात

शिळे भात खाल्ल्यानेही अन्न विषबाधा होण्याचा धोका असतो. तांदूळ जर शिळा असेल तर त्याचे सेवन करु नका. शिळा भात खाल्ल्याने तुम्हाला पचनाच्या अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

तेलकट अन्नपदार्थ

तेलकट पदार्थ गरम केल्यावर हानिकारक रसायने तयार होतात जी आरोग्यासाठी हानिकारक असतात. जर आपण शिळे तेलकट पदार्थ खात असाल तर ते जास्त गरम करू नका. निरोगी राहण्यासाठी शिळा असताना तेलकट पदार्थ खाऊ नका.

भारतीय पुरूषांमध्ये वाढतेय इन्फर्टीलिटीची समस्या; 'या' सवयीवर वेळीच नियंत्रण ठेवावं लागणार

फळं

डॉक्टर सांगतात की, उकाड्याच्या दिवसांमध्ये ४ ते ५ तासांपेक्षा आधी तयार करण्यात आलेलं अन्न खाऊ नका. तसेच सॅलेड आणि फळं हे कापल्यानंतर लगेच खावीत किंवा जेव्हा खायचं आहे तेव्हाच कापावे. जर तुम्ही शिळं अन्न किंवा फळं खाल्लीत तर वेगवेगळ्या समस्या होऊ शकतात. 

या वातावरणात फूड पॉयजनिंगची प्रकरणे अधिक बघायला मिळतात. याचं कारण तापमान अधिक असल्याकारणाने अन्नात बॅक्टेरिया अधिक होतात आणि वाढतात. हे बॅक्टेरिया ५ जिग्री सेल्सीअस ते ६० डिग्री सेल्सीअसच्या तापमानात वेगाने वाढतात. एक-दोन तासातच बॅक्टेरियाची संख्या २ ते ३ पटीने वाढू लागते. ज्यामुळे अन्न विषारी होऊ शकतं. असं अन्न खाल्ल्यावर पोटदुखी, उलटी, फूड पॉयजनिंगची लक्षणे दिसू शकतात. 

तुम्हालाही सतत तहान लागत असेल तर असू शकतो 'हा' गंभीर आजार; दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात

दुधाचे पदार्थ

काही लोक दूध फ्रिजमध्ये ठेवून २ ते ३ दिवसांपर्यंत वापरत राहतात. तुम्ही जर ताजं दूध घेतलं असेल ते उकडून त्याच दिवशी संपवा. जर तुम्ही पॅकेटमधील दुधाचा वापर करत असाल तर त्यावरील एक्सपायरी डेट चेक करुन वापर करा. 

शिळ्याचे परिणाम

शरीराची  चयापचय क्रिया बिघडली की शरीरात नको इतक्या प्रमाणात मेद, चरबी साठू लागते. स्थूलता वाढीस लागते! चरबीचं नीट पचन न झाल्यानं कमी आहार घेतला तरी वजन वाढतच राहातं. रक्तात कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढू लागतं. पुढे शिळं अन्न खाण्याची सवय तशीच राहिल्यास रक्तवाहिन्या संकुचित होतात. त्यात ब्लॉक्स तयार होऊन हृदयविकार होण्याची शक्यता बळावते. 

ब-याच रुग्णांमध्ये याबरोबरच वाताची विकृती झाल्यास सांधे सुजणं, दुखणं, गरम लाल होणं, सांधे आखडून हालचाल अशक्य होणं इतका त्नास उद्भवू शकतो!

रोजच्या बघण्यात असे अनेक रुग्ण असतात की ज्यांना थोडं जरी शिळं अन्न खाल्लं तरी जळजळ होते, मळमळ होते, उलट्या होतात, पित्त वाढून प्रचंड डोकं दुखतं. थोडा पोळीचा कुस्करा, शिळी खिचडी काहीही खाल्लं तरी कामाचा पूर्ण दिवस वाया जातो. ज्या व्यक्तींची पित्त प्रकृती आहे त्यांना शिळ्या अन्नाचे परिणाम ताबडतोब जाणवतात कारण त्यांचा अग्नी अतिशय संवेदनशील असतो.

टॅग्स :foodअन्नHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य