शहरं
Join us  
Trending Stories
1
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
2
पुतिन यांनीच फोडला 'बॉम्ब'! तेल खरेदी करण्यावरुन भारतावर निर्बंध, पण स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
3
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला कोणतेही पद नको; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
4
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
5
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
6
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
7
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
8
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
9
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
10
“मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे”; संजय राऊतांचा पलटवार
11
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
12
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
13
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
14
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
16
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
17
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
18
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
19
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
20
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना

सफरचंद खाताय? सावधान! ही काळजी घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 03:30 IST

‘अ‍ॅन अ‍ॅपल इन ए डे, कीप्स डॉक्टर अवे’ अशी इंग्रजीत म्हण आहे. सफरचंद कुणाला आवडत नाही? जगभरात हे फळ आवडीने खाल्ले जाते. पण...

‘अ‍ॅन अ‍ॅपल इन ए डे, कीप्स डॉक्टर अवे’ अशी इंग्रजीत म्हण आहे. सफरचंद कुणाला आवडत नाही? जगभरात हे फळ आवडीने खाल्ले जाते. फळाचा गर खाताना, काही जणांना त्याच्या काळ्या बिया कुरतडून खायची सवय असते, पण त्याच्या या कडू लागणाऱ्या बियामध्ये एक कटू वास्तव्य आहे व ते आता वैज्ञानिकांना कळून आले आहे. त्या बियामध्ये अ‍ॅमिग्दालीन नावाचे एक वनस्पती रसायन असते. सफरचंद, जर्दाळू, बदाम, पीच व चेरी ही वनस्पतीच्या ‘रोझ फॅमिली’तील फळे आहेत आणि त्यांच्या बियांत हे रसायन सर्रास आढळते.वास्तविक, अ‍ॅमिग्दालीन हे रसायन हे या वनस्पतीच्या संरक्षण यंत्रणेचा भाग असतो. तसे ते रसायन निरुपद्रवी असते, पण जेव्हा बिया चिरडल्या जातात, चघळल्या जातात, कुरतडल्या जातात, तेव्हा त्या रसायनाचे विघटन होते व त्याचे हायड्रोजन सायनाइड या विषारी रसायनात रूपांतर होते. सायनाइड हे रसायन विषारी असल्याचे जगजाहीर आहे. हे रसायन शरीरपेशींना होणाºया आॅक्सिजनच्या पुरवठयात अडथळा आणते व ते मोठ्या प्रमाणात शरीरात जीवघेणे ठरते. जरी फळाच्या बियातील हे रसायन अल्प प्रमाणात असले, तरी ते मोठ्या प्रमाणात शरीराला घातक ठरू शकते, तेव्हा अख्खे सफरचंद खाताना सावधान असावे. मुलांना या फळांच्या बिया काढून, फोडी करून खायला द्यावीत, असे तज्ज्ञ सल्ला देत आहेत.आपल्या शरीराची संरक्षणयंत्रणा इतकी कार्यक्षम असते की, शरीरात कळत-नकळत अल्प प्रमाणात घुसणाºया अपायकरक पदार्थांना ती जेरबंद करत असते. विशेषत: तोंडातून शरीरात जाणाºया अशा अपायकारक अन्नाचा ती बंदोबस्त करत राहते, परंतु त्यांचे प्रमाण वाढीव असले की, मात्र शरीर व्याधीचे बळी ठरते. अर्थात, विषारी रसायने इंजेक्शनद्वारा अल्प प्रमाणातसुद्धा सरळ रक्तात घुसतात, तेव्हा त्यांचा परिणाम तत्काळ दिसून येतो.- जोसेफ तुस्कानो(लेखक ज्येष्ठ विज्ञानलेखक वपर्यावरण अभ्यासक आहेत.) 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य