शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

रात्री वेळेत जेवणाचे हे फायदे वाचून व्हाल अवाक्! अनेक गंभीर आजारांना दूर ठेवण्यास होते मदत....

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2021 16:34 IST

रोजच्या बिझी शेड्युलमध्ये काम वेळेत होतात पण जेवणाला वेळ मिळत नाही. आधीच बाहेरचे खाणे आणि जंक फूडमुळे स्वास्थ्य बिघडलेलं असतं; अशावेळी रात्रीच्या जेवणाची वेळ पाळाल तर फायदे वाचून अवाक् व्हाल!

इंग्रजीत एक म्हण आहे. त्याचे मराठी भाषांतर असे की, सकाळी राजासारखा नाश्ता करावा, एखाद्या राजकुमाराप्रमाणे दुपारचे भोजन करावे आणि रात्री एखाद्या सामान्य माणसाप्रमाणे भोजन उरकावे. पण मित्रांनो रात्रीच्या जेवणाचे महत्व फार मोठं आहे. त्यातही रात्रीच्या वेळी वेळेवर जेवणं याचे पाच मुख्य फायदे तर जाणून घेतलेच पाहिजेत.

१. शांत झोप

वेळेत जेवण म्हणजे काय तर ७च्या आधी जेवणे. आता तुम्हाला वाटेल याने काय फरक पडतो. तर याने सर्वात जास्त फरक पडतो तो म्हणजे शांत झोप लागते. केवळ आपल्या शरीरासाठीच नव्हे तर उत्तम मानसिक स्वास्थ्यासाठी रात्रीची पुरेशी झोप अति आवश्यक आहे. वेळेवर जेवण केल्याने ते पचतंही वेळेत त्यामुळे तुम्हाला रात्रीची झोप शांत लागते.

२. वजन कमी होणेरात्री वेळेत जेवल्याने शरीरातील अन्न व्यवस्थित पचते. हे पचलेले अन्न विविध मार्गांनी तुमच्या शरिरातील इतर अवयवांना एनर्जी मिळते. तसेच यामुळे शरीरातील मेटाबॉलिजम वाढते. ज्याचा उपयोग वजन नियंत्रित ठेवण्यासाठी होतो.

३. पचनशक्ती वाढते

रात्री जेवल्यानंतर लगेचच झोपल्यामुळे शरीराला अन्न पचन करायला वेळचं मिळतं नाही. त्यामुळे पोटाचे विकार, पचनासंबधीचे विकार होतात. हे टाळायचं असेल तर वेळेत जेवा.

४. मधुमेहाचा धोका कमी होतोमधुमेह नियंत्रित राखण्यासाठी रात्री वेळेत जेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. रात्रीची जेवणाची वेळ पाळल्याने अन्न पचनप्रक्रियेत तयार होणारे अतिरिक्त ग्लुकोज तयार होत नाही. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी वेळेत जेवणे अत्यंत महत्वाचे आहे.

५. हृदयाचे स्वास्थ्य सुधारतेआपल्या हृदयाच्या स्वास्थासाठी वेळेत जेवा. यामुळे तुमच्या शरीरातील कॅलरी बर्न होण्यास पचनसंस्थेला पुरेसा वेळ मिळतो. तसेच शरीरासाठी अपायकारक फॅटी अ‍ॅसिड्सही तयार होत नाहीत. याच फॅटी अ‍ॅसिड्समुळे हृदयरोगाचा झटका येण्याची शक्यता बळावते. त्यामुळे हे सर्व नियंत्रित ठेवण्याचे कार्य रात्रीच्या वेळी वेळेत जेवल्याने होते.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यfoodअन्न