शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

स्नायूंच्या दुखण्यांपासून दूर राहण्याचे सोपे मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 02:15 IST

पावसाळ्यात अनेकांना स्नायूंच्या दुखण्याला सामोरे जावे लागते.

पावसाळ्यात अनेकांना स्नायूंच्या दुखण्याला सामोरे जावे लागते. या काळात चिखलाने भरलेल्या रस्त्यांवरून जाण्याचे कष्टप्रद आव्हान पेलताना आणि ओल्या निसरड्या फरसबंदीवरून चालताना, तुमच्या शरीराला काही ना काही दुखापत होते. मात्र, अशा वेदनेपासून तुम्हाला दूर ठेवण्याचा एक सोपा मार्ग आहे. दुखावणाºया स्नायूंना या काही साध्या तेलांनी मालीश केले तर तुमचे दुखणे कमी होईल आणि तुमच्या शरीराला ताजेतवाने आणि हलके वाटेल. पाहू या अशा काही तेलांची माहिती...लँग लँग आॅइललँग लँग आॅइल हे कनांगा ओडोराटा या वनस्पतीच्या फुलापासून तयार केले जाते. या वनस्पतीची लागवड प्रामुख्याने इंडोनेशिया, फिलिपीन्स आणि मलेशियात केली जाते. हे तेल त्याच्या अप्रतिम सुगंधामुळे ओळखले जाते. हे तेल शरीरावर लावल्यास स्नायूंची वेदना दूर करणे. लँग लँग आॅइल आॅलिव्ह कॅरियर आॅइलमध्ये समप्रमाणात मिसळून हलक्या हाताने पोटºया, बाहू आणि अन्य ठिकाणच्या दुखणाºया स्नायूंवर चोळावे.पेपरमिंट आॅइलपेपरमिंट आॅइलचा सुगंध सर्वोत्कृष्ट ताजेपणा देणारा आहे. श्वासाला ताजेपणा देण्याशिवाय पेपरमिंट आॅइलमध्ये अनेक गुणधर्म आहेत. पचनशक्ती वाढवण्याबरोबरच शरीरातील ऊर्जा वाढवण्यातही ते साहाय्यक ठरते. महत्त्वाचे म्हणजे दुखºया स्नायूंना मसाज करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. पेपरमिंट आॅइल तुमच्या पसंतीच्या कॅरियर आॅइलमध्ये समप्रमाणात मिसळून दुखावलेल्या भागावर काही मिनिटे मसाज करा. त्यामुळे दुखावलेले स्नायू मोकळे करण्याकरिता मदत होईलजरेनियम आॅइल : प्रामुख्याने समशीतोष्ण कटिबंध प्रदेशात या फुलाची लागवड केली जाते. जरेनियम फुल त्याच्या लोभस अशा रंग आणि सुगंधामुळे ओळखले जाते. या फुलापासून काढलेल्या तेलाचा वापर नैराश्य आणि ताणतणाव दूर करण्यासाठी केला जातो. त्याशिवाय हार्मोनशी संबंधित समस्यांवरही त्याचा उपयोग होतो. या तेल आॅलिव्ह आॅइलमध्ये मिसळून त्याचा वापर केल्यास स्नायूचे दुखणे कमी होते.>रोझमेरी आॅइलरोझमेरीचे तेल हे स्नायूंचे दुखणे दूर करण्यासाठीचे उत्तम मसाज तेल आहे. त्याचा वापर करण्याआधी त्यात काही थेंब तिळाच्या तेलासारखे काही कॅरियर आॅइल मिसळून ते विरल करा. त्यानंतर त्याने दुखावलेल्या स्नायूवर मालीश करा. रात्री मालिश केल्यानंतर स्नायू मोकळे होतील. तुम्हाला ताजातवाना, वेदनामुक्त अनुभव सकाळी येईल.>लॅव्हेंडर आॅइललॅव्हेंडरचा सुगंध थंडावा देणारा, मन शांत व प्रसन्न करणारा आहे. या फुलझाडात ताजेपणा देणारा आणि स्वच्छतेचा असे दोन्ही गुणधर्म आहेत. सौंदर्यसाधनेच्या अनेक उत्पादनांत त्याचा वापर केला जातो. स्नायूंच्या वेदनेवर, स्नायूंच्या थकव्यावरही त्याचा उपयोग होतो. या तेलाचे काही थेंब थकलेल्या स्नायूंवर लावले तर त्यातून दुखणे कमी होते. या तेलाने मसाज केले तर चांगली झोप लागते.