शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

किडनी स्टोन झालाय हे कसे ओळखाल? ही आहेत लक्षणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2018 15:35 IST

खरंतर हा त्रास होऊ नये यासाठी आधीच याची लक्षणे काय असतात याकडे लक्ष देणे फायद्याचे ठरेल.

खाण्यापिण्यातील अनियमीतता आणि आवश्यक तेवढं पाणी न पिणे हे किडनी स्टोन होण्याचं मुख्य कारण आहे. मुतखडा म्हणजेच किडनी स्टोन अनेकांना होतो पण काहींच्या किडनीमध्ये तयार झालेला स्टोन सहज बाहेर पडतो. मात्र, काहींचा स्टोन मोठा असल्याने तो बाहेर पडण्यास अडचणी येतात. त्यामुळे काही लोकांना फार जास्त त्रास सहन करावा लागतो. खरंतर हा त्रास होऊ नये यासाठी आधीच याची लक्षणे काय असतात याकडे लक्ष देणे फायद्याचे ठरेल. जेणेकरुन वेळेवर उपचार घेऊन ही समस्या दूर करता येईल. चला जाणून घेऊया किडनी स्टोनचे काही संकेत. 

सरुवातीचे लक्षणे

किडनी स्टोनमुळे पाठीच्या खालच्या भागात फार जास्त वेदना होतात. हा त्रास काही तास किंवा काही मिनिटांसाठीही होऊ शकतो. यात वेदना होण्यासोबतच जीव मळमळणे किंवा ओमेटींगही होऊ शकते. खूप जास्त घाम येणे, लघवी करताना त्रास होणे असेही प्राथमिक लक्षणे आहेत. 

लघवीतून रक्त

किडनी स्टोनची समस्या असणाऱ्या लोकांना नेहमी गुलाबी, लाल रंगाची लघवी येऊ लागते. आणि स्टोनचा आकार वाढल्याने मूत्रमार्ग ब्लॉग होतो. किडनी स्टोन झालेल्या लोकांच्या लघवीतून कधी कधी रक्तही येतं. 

सतत लघवीला जावे लागणे

किडनी स्टोनने ग्रस्त लोकांना सतत त्रास होण्यासोबत लघवीला जावं लागतं. असं किडनी स्टोन मूत्रमार्गातून मूत्राशयात गेल्यावर होतं. ही गोष्ट फारच त्रासदायक असते. यामुळे असह्य असा त्रास होतो. 

पाठदुखी

तीव्र वेदना होणं ही कि़डनी स्टोनने ग्रस्त लोकांसाठी सामान्य बाब आहे. खासकरुन कंबर आणि कबंरेखालील भागात खूप जास्त असह्य वेदना होतात. या वेदना काही मिनिटांसाठी किंवा काही तासांसाठीही होऊ शकतात. 

मळमळ होणे आणि ओमेटींग

पोटात कसंतरी होणे आणि मळमळ होणे हे किडनी स्टोनचे सुरुवातीचे संकेत आहेत. अनेकदा ओमेटींगही होते. 

लघवीतून दुर्गंधी येणे

किडनी स्टोन झाल्यास लघवीचा रंग लालसर येतो आणि दुर्गंधीही येते. 

बसल्यावर वेदना होणे

किडनी स्टोन वाढल्याने त्या भागात वेदना होऊ लागतात. त्यामुळे त्या लोकांना बसायला त्रास होतो. इतकेच काय तर ते कधी कधी आरामात झोपूही शकत नाही. 

ताप येणे आणि थंडी लागणे

किडनी स्टोनमुळे अनेकदा ताप येणे, थंडी वाजणे या समस्याही होतात. अशावेळी लगेच डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. 

किडनी आणि पोटावर सूज येणे

मोठ्या आकाराचे स्टोन हे मूत्रमार्ग ब्लॉक करतात. त्यामुळे किडनीवर वेदना देणारी सूज येते. त्यासोबतच पोट आणि कंबरेच्या भागातही सूज येते.  

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य